पालकमंत्र्यांच्या परीक्षेत अकोला पोलीस पास; कंटेन्मेंट झोनमध्ये शिरण्यास केली मनाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 16:52 IST2020-05-14T16:41:09+5:302020-05-14T16:52:52+5:30
पालकमंत्री बच्चू कडू यांनी घेतली पोलिसांच्या बंदोबस्ताची परीक्षा; वेष पालटून कंटेन्मेंट झोनमध्ये शिरण्याचा केला प्रयत्न.

पालकमंत्र्यांच्या परीक्षेत अकोला पोलीस पास; कंटेन्मेंट झोनमध्ये शिरण्यास केली मनाई
अकोला : जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, राज्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री व राज्यमंत्री बच्चू कडू यांनी गुरूवारी अकोल्यातील कोरोना कन्टेन्मेंट झोनमध्ये शिरण्याचे स्टिंग आॅपरेशन केले. कंटेटमेंट झोनमध्ये पोलिस सर्रास सोडत असल्याच्या तक्रारीची खातरजमा त्यांनी आपली ओळख लपवून करून या प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना रोखले. अकोला शहरात कमटेन्मेंट झोनमध्ये फिजिकल डिस्टसिंगचा बोजवारा उडाल्याचं चित्र गेल्या अनेक दिवसांपासून अकोल्यात पहायला मिळत आहे.. या पृष्ठभूमीवर बच्चू कडू यांनी स्टींग ऑपरेशन केलं. मात्र, सुदैवानं पालकमंत्र्यांच्या परिक्षेत अकोला पोलीस उत्तीर्ण झाले; मात्र, पुढच्या काळात प्रतिबंधित क्षेत्रात संचारबंदीची आणखी कठोर अंमलबजावणी करण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी यावेळी पोलीसांना दिल्या. तर दरम्यान, एका व्यक्तीला गुटख्याची विक्री करतांना पालकमंत्र्यांनी रंगेहात पकडले. त्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात घेवून गेले आणि गुटखा कुठून आणला यााबाबत वविचारणा करून त्यावर कारवाई करण्याचं निर्देश दिले. तसेच जिल्हा स्त्री रुग्णालयात अस्वच्छता दिसून आल्यानंतर सबंधित कंत्राटदाराला तब्बल एका लाखांचा दंड ठोठवला आणि रस्त्याच्या माधोमध एक पोलीस कर्मचारी मोबाइल वर संभाषण करताना दिसून आल्यानंतर त्याला देखील 200 रूपये दंड केला.