शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : पोलिसांची ६0 तासांपेक्षा अधिक ड्युटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 01:20 IST

अकोला : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मद्यधुंद, हैदोस घालणार्‍यांवर नजर ठेवण्यासाठी ३१ डिसेंबर २0१७ रोजी सायंकाळी ६ वाजेपासून ड्युटीवर असलेल्या अकोला पोलिसांची ड्युटी ६0 तासांपेक्षा अधिक झाली आहे. नववर्षाचे स्वागत आटोपत नाही तेच कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेनंतर पोलीस रात्रंदिवस रस्त्यावर असून, गत तीन दिवसांमध्ये त्यांच्या ड्युटीचा कार्यकाळ हा ६0 तासांपेक्षाही अधिक झाला आहे.

ठळक मुद्देपोलिसांशी सामंजस्यांने वागारस्त्यावरील पोलिसांचाही करा विचार!

सचिन राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मद्यधुंद, हैदोस घालणार्‍यांवर नजर ठेवण्यासाठी ३१ डिसेंबर २0१७ रोजी सायंकाळी ६ वाजेपासून ड्युटीवर असलेल्या अकोला पोलिसांची ड्युटी ६0 तासांपेक्षा अधिक झाली आहे. नववर्षाचे स्वागत आटोपत नाही तेच कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेनंतर पोलीस रात्रंदिवस रस्त्यावर असून, गत तीन दिवसांमध्ये त्यांच्या ड्युटीचा कार्यकाळ हा ६0 तासांपेक्षाही अधिक झाला आहे.नववर्षाचे स्वागत आटोपल्यानंतर अकोला पोलीस एक जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे ड्युटीवर कार्यरत होते; मात्र त्यानंतर १  जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथील घडलेल्या घटनेनंतर राज्यातील पोलिसांना २४ तास ड्युटीवर हजर होण्याचे आदेश देण्यात आले.  २ जानेवारीच्या सकाळपासून पोलीस रस्त्यावर ड्युटीसाठी उतरले आहेत. ३१ डिसेंबरच्या रात्रभरानंतर गत तीन दिवसांपासूनही अकोला पोलीस ड्युटीवर असून, आंदोलन व नववर्षाच्या स्वागतामुळे पोलिसांवर मोठा ताण पडला. किरकोळ कारणांवरून पोलिसांशी हुज्जत घालणार्‍यांनी त्यांच्या मानसिकतेचा विचार करून त्यांच्याशी सौजन्याने वागण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र बंदची हाक देताच अकोला पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी अकोला पोलिसांना आदेश देऊन मंगळवारी सायंकाळपासूनच कार्यरत केले होते. शहरात चारही बाजूने येत असलेल्या आंदोलकांना समजावून सांगत हे आंदोलन शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी मोठी कसरत केली. तीन दिवसांपासून कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी महाराष्ट्र बंद मागे घेतल्यानंतर सुटकेचा नि:श्‍वास टाकला; मात्र विशेष पोलीस महानिरीक्षक एच. सी. वाकडे यांचेही वार्षिक निरीक्षण लवकरच सुरू होणार असून, त्याचाही ताण या पोलिसांवर आहे. अकोला पोलिसांनी गत तीन दिवसांमध्ये बजाविलेल्या सततच्या कर्तव्यामुळे कामाचा ताण मोठय़ा प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. याचाच परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत असल्याचे वास्तव आहे.

सर्वाधिक धरणे-मोर्चे अकोल्यातअकोला जिल्हय़ात धरणे, मोर्चे, गणेशोत्सव, कावड महोत्सव, रामनवमी शोभायात्रा, हनुमान जयंती शोभायात्रा, मोहरम, १४ एप्रिल, धम्मचक्र प्रवर्तन दिन, चेट्रीचंड, गोगा जयंतीसह विविध शोभायात्रा व मिरवणूक निघतात. राज्यात सर्वाधिक मिरवणूक व शोभायात्रा अकोला शहर व जिल्हय़ात निघत असून, याचा ताण साहजिकच अकोला पोलिसांवर अधिक असतो.

२४ तास कर्तव्य बजावणार्‍या पोलिसांचाही विचार करावा. ६ ते ८ तास ड्युटी असणार्‍या शासकीय नोकरदारांसह व्यापारी, उद्योजक, दुचाकी व चारचाकी वाहन चालकांनी २४ तासांपेक्षा अधिक ड्युटी करणार्‍या पोलिसांच्या मानसिकतेचा विचार करावा व पोलिसांशी सौजन्याने वागण्याची अपेक्षा आहे. - विलास पाटील, प्रमुख, वाहतूक शाखा अकोला.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावAkola cityअकोला शहरPoliceपोलिस