अकोला पोलीस खात्यातील कर्मचार्याचा हृदयविकाराने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 21:49 IST2017-12-11T21:45:29+5:302017-12-11T21:49:42+5:30
अकोला पोलीस खात्यात बाळापूर येथे कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी जनार्दन बळीराम चंदन (५0) यांना रविवारी रात्री उशिरा अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.

अकोला पोलीस खात्यातील कर्मचार्याचा हृदयविकाराने मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोला पोलीस खात्यात बाळापूर येथे कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी जनार्दन बळीराम चंदन (५0) यांना रविवारी रात्री उशिरा अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. पोलीस कर्मचार्यास हृदयविकाराचा झटका येताच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना मृत घोषित केले.
बाळापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले जनार्दन चंदन हे रविवारी कर्तव्यावर होते. कर्तव्य संपल्यानंतर ते घरी गेले. त्यानंतर छातीत थोडा त्रास असल्याने लवकर झोपी गेले. मात्र, झोपेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना मृत घोषित केले.