शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
3
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
4
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
5
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
6
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
7
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
8
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
9
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
10
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
11
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
12
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
13
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
14
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
15
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
16
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
17
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
18
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
19
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
20
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल

अकोला :  शिष्यवृत्तीचा ऑनलाइन गोंधळ अखेर थांबला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 1:45 AM

अकोला :  अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व दिल्या जाणार्‍या विविध शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत प्रचंड गोंधळ झाल्यानंतर अखेर ऑफलाइन अर्ज सादर करण्याची तयारी समाजकल्याण आयुक्तालयाने केली आहे. त्यासाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना २0१७-१८ साठी महाडिबिटी पोर्टलवरून वगळण्यात आली आहे. 

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे अर्ज ऑफलाइन करण्याचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :  अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व दिल्या जाणार्‍या विविध शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत प्रचंड गोंधळ झाल्यानंतर अखेर ऑफलाइन अर्ज सादर करण्याची तयारी समाजकल्याण आयुक्तालयाने केली आहे. त्यासाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना २0१७-१८ साठी महाडिबिटी पोर्टलवरून वगळण्यात आली आहे. यावर्षीच्या शैक्षणिक सत्रातील निम्मा कालावधी उलटला. तरीही चालू शैक्षणिक सत्रातील शिष्यवृत्तीचा लाभ अद्यापही मिळालेला नाही. मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचे लाभार्थी असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचा आदेश देण्यात आला. त्याचवेळी त्यामध्ये प्रचंड अडचणीही निर्माण झाल्या. त्या अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्जाबाबत राज्यातील सर्वच जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकार्‍यांचा गोंधळ झाला. त्याबाबत आयुक्तालयाने मार्गदर्शन करावे, असा पवित्रा १८ डिसेंबर रोजीच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये घेतला. त्यामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थी आणि प्रशासकीय यंत्रणेची त्यातून तात्पुरती सुटका करण्यात आली. त्यामध्ये चार प्रकारांतील शिष्यवृत्तीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची संधी देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांच्या आधार क्रमांक संलग्न बँक खात्यातच जमा केली जाणार आहे. त्यासाठी अर्जासोबत ही माहिती घेतली जाणार आहे. 

या शिष्यवृत्तीसाठी ऑफलाइनची सोयऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची सोय चार योजनेतील लाभार्थीसाठी करण्यात आली. त्यामध्ये राज्य शासनाची शिक्षण फी, परीक्षा फी प्रतिपूर्ती योजना, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती (इयत्ता ५ वी ते ७ वी), सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती (इयत्ता ८ वी ते १0 वी), माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शालांतपूर्व अपंग शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर अपंग शिष्यवृत्ती योजनेचा समावेश आहे. 

महाडिबिटी पोर्टलवर अर्ज करण्याची गरज नाही!मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती २0१७-१८ साठी महाडिबिटी पोर्टलवरून वगळण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चालू सत्रासाठी त्या पोर्टलवर अर्ज करू नये, असे आवाहन प्रभारी समाजकल्याण अधिकारी योगेश जवादे यांनी केले आहे. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरeducationशैक्षणिक