शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : पातूर तालुक्यातील चतारी शिवारात बिबट्याने फस्त केली नीलगाय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 20:17 IST

चतारी (अकोला): पातूर तालुक्यातील चतारी शिवारात झालेल्या झटापटीत बिबट्याने  नीलगाय फस्त केल्याची घटना शनिवारी रात्री १0.३0 ते ११ वाजताच्या सुमारास घडली  आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देशनिवारी रात्री १0.३0 वाजता झटापट झाल्याची माहितीपरिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 

लोकमत न्यूज नेटवर्कचतारी (अकोला): पातूर तालुक्यातील चतारी शिवारात झालेल्या झटापटीत बिबट्याने  नीलगाय फस्त केल्याची घटना शनिवारी रात्री १0.३0 ते ११ वाजताच्या सुमारास घडली  आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.चतारी गावापासून थोड्याच अंतरावरील डॉ. श्रीधर ढोरे यांच्या शेतात ही घटना घडली  असून, यांच्याच शेताच्या बाजूच्या शेतात रात्री जागलीवर असलेले हरिभाऊ ढोरे यांनी  रात्रीच्या वेळी बिबट व नीलगायीमध्ये झालेल्या झटापटीचे आवाज ऐकले. यामध्ये त्यांना  बिबट्याच्या डरकाळीचा आवाज येत असल्याने त्यांनी त्याच्या मुलाला फोन करून शेतात  बोलावले व त्यांना समजलेला प्रकार सांगितला. दुसर्‍या दिवशी सकाळी या घटनास्थळाकडे  गावातील आठ ते दहा शेतकरी झालेली घटना पाहावयास गेले असता सदर प्रकारात बिबट  व नीलगाय यांच्यात झटापट झालेली होती. तेथे जवळपास तीन ते चार गुंठे शेतातील तुरीचे  पीक नीलगायीच्या रक्ताने माखलेले आहे व नीलगाय मृतावस्थेत पडलेली होती. या  नीलगायीच्या अंगावर बिबट्याच्या पंजाच्या नखाच्या खुणा दिसत आहेत. सदर प्रकार वन  विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी नालिंदे यांना कळविले असता, त्यांनी वन विभागाचे एच.  आर. राठोड, वनरक्षक एस. ए. तावडे, वनमजूर एस. जी. कळंब, राजीव हुसेन, गजानन  मुर्तंडकर, राजकुमार तायडे यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. सदर नीलगायीला  बिबट्याने ठार केले असल्याची माहिती राठोड यांनी दिली. नीलगायीच्या मृतदेहाचा पंचनामा  करून अग्नी देण्यात आला. सदर घडलेल्या प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण  झाले असून, शेतकरी व शेतमजूर भयभीत झाले आहेत.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणforestजंगल