Akola: एनएचएम कर्मचाऱ्यांनी रक्तदान करीत केले अनाेखे आंदाेलन, कॅंडल मार्च काढण्याची तयारी

By सचिन राऊत | Updated: November 6, 2023 18:39 IST2023-11-06T18:38:44+5:302023-11-06T18:39:18+5:30

Akola News: शासनाच्या रिक्त पदांवर समायोजन करण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम)अंतर्गत वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर गत १३ दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

Akola: NHM employees donating blood and preparing for candle march | Akola: एनएचएम कर्मचाऱ्यांनी रक्तदान करीत केले अनाेखे आंदाेलन, कॅंडल मार्च काढण्याची तयारी

Akola: एनएचएम कर्मचाऱ्यांनी रक्तदान करीत केले अनाेखे आंदाेलन, कॅंडल मार्च काढण्याची तयारी

- सचिन राऊत  
अकोला - शासनाच्या रिक्त पदांवर समायोजन करण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम)अंतर्गत वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर गत १३ दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. आंदाेलनाच्या १३ व्या दिवशी साेमवारी आंदाेलनस्थळी एनएचएमच्या २० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. आता कॅंडल मार्च काढण्याची तयारी आंदाेलनकर्त्यांनी केली आहे.

राष्ट्रीय आराेग्य अभियान अधिकारी-कर्मचारी गत १३ दिवसांपासून आंदाेलन करीत असताना शासन दखल घेत नसल्याने यावेळी काही कर्मचाऱ्यांनी रक्तदान करीत अनाेखे आंदाेलन केले. या आंदोलनात ८०० पेक्षा अधिक कंत्राटी अधिकारी- कर्मचारी सहभागी झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी परिचारिका, जीएनएम एलएचव्ही, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व एनएचएमअंतर्गत कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांना रिक्तपदांवर समायोजन करण्याबाबत शासनाशी पत्रव्यवहार करण्यात आल्याचे कृती समितीचे म्हणणे आहे. याची दखल न घेतल्याने २५ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार साेमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत कृती समितीने घोषणा दिल्या व आंदोलन केले. १३ दिवसांपासून अधिकारी, कर्मचारी आंदाेलन करीत असताना शासन दखल घेत नसल्याने यावेळी काही कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून आंदाेलन केले. यावेळी राष्ट्रीय आराेग्य अभियानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या आंदाेलनाला आराेग्य संस्थांचा पाठिंबा मिळत असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Akola: NHM employees donating blood and preparing for candle march

टॅग्स :Akolaअकोला