शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

अकोल्यात राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या सर्व्हिस रोडचा पेच कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 1:31 PM

अकोला : अमरावती-चिखलीच्या १९४ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असून, हा मार्ग नागरी वसाहतींच्या मधून जाणार आहे. महानगरातून जाणाºया या चौपदरीकरणालगत १२ मीटरचे सर्व्हिस रोड बांधले जाणार आहेत. मात्र, अनेक ठिकाणी १२ मीटरची पुरेशी रूंदी मिळत नसल्याने आता सर्व्हिस रोडचा नवा पेच निर्माण झाला आहे. सर्व्हिस रोडच्या रूंदीबाबतच्या निर्णयात बदल करावा, त्यामुळे अनेक शहरातील समस्या दूर होतील, अशा आशयाचे निवेदन अकोला क्रेडाईच्या पदाधिकाºयांनी, महामार्ग प्राधिकरण व महापालिका प्रशासनास दिले.

ठळक मुद्देमहामार्गाला समांतर जाणारा शहरातील सर्व्हिस रोड १२ मीटरचा अतिरिक्त तयार करण्याचा प्रस्ताव आहे.सर्व्हिस रोड शहरातून जात असताना एवढी जागा पुन्हा अधिग्रहित करणे कठीण होणार आहे.सर्व्हिस रोडच्या रूंदीबाबतच्या निर्णयात बदल करण्याची क्रेडाईची मागणी.

अकोला : अमरावती-चिखलीच्या १९४ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असून, हा मार्ग नागरी वसाहतींच्या मधून जाणार आहे. महानगरातून जाणाºया या चौपदरीकरणालगत १२ मीटरचे सर्व्हिस रोड बांधले जाणार आहेत. मात्र, अनेक ठिकाणी १२ मीटरची पुरेशी रूंदी मिळत नसल्याने आता सर्व्हिस रोडचा नवा पेच निर्माण झाला आहे. सर्व्हिस रोडच्या रूंदीबाबतच्या निर्णयात बदल करावा, त्यामुळे अनेक शहरातील समस्या दूर होतील, अशा आशयाचे निवेदन अकोला क्रेडाईच्या पदाधिकाºयांनी, महामार्ग प्राधिकरण व महापालिका प्रशासनास दिले.पूर्वी महामार्गाचे लेआउट करताना ४५ मीटर चौपदरीकरणाची रूंदी आणि १२ मीटर सर्व्हिस रोड गृहित धरला गेला होता. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाने आता चौपदरीकरणाची रूंदी ६० मीटर केली आहे. त्यामुळे दोन्हीकडे साडेसात मीटरची रूंदी वाढविली जाणार आहे. त्यानंतर महामार्गाला समांतर जाणारा शहरातील सर्व्हिस रोड १२ मीटरचा अतिरिक्त तयार करण्याचा प्रस्ताव आहे. सर्व्हिस रोड शहरातून जात असताना एवढी जागा पुन्हा अधिग्रहित करणे कठीण होणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी महामार्गाला समांतर जाणारा सर्व्हिस रोड चौपदरीकरणावर ओव्हरलॅप होण्याची दाट शक्यता आहे. असे जर झाले, तर सर्व्हिस रोडच्या मुख्य उद्देशालाच छेद जाईल. त्या भागातील वाहतूक आतल्या आत झाली पाहिजे आणि अपघाताच्या घटनांवर अंकुश बसावा, म्हणून शहरातील महामार्गावर सर्व्हिस रोड काढले जातात; मात्र पुरेशी जागा अधिग्रहित करता येत नसल्याने सर्व्हिस रोड महामार्गाच्या भागावर ओव्हरलॅप होणार आहे. आधीच्या लेआउटनुसार सर्व्हिसमध्ये विसंगती निर्माण होत आहे. १२ मीटरऐवजी सर्व्हिस रोड साडेचार मीटरचा करणे शक्य होईल. यासाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असा सूर आवळला जात आहे. अकोला शहरातील एमआयडीसी, मलकापूर, खडकी, सर्व्हिस रोड जाणार आहे. त्या ठिकाणी सर्व्हिस रोडची रूंदी कमी केल्यास तो कायम सारखा राहू शकतो.

६० मीटर रूंदीनंतर १२ मीटर सर्व्हिस रोड सोडावा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण शहरातून जात असताना ६० मीटर रूंदीनंतर १२ मीटर सर्व्हिस रोड सोडावा, असा नियम आहे. मात्र, काही ठिकाणी जागा नसेलच, त्या ठिकाणी तो कमी होऊ शकतो, अशा ठिकाणी सर्व्हिस रोड राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणावर ओव्हरलॅप होऊ शकतो, असे अमरावतीच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सूत्रांनी सांगितले आहे.

 

टॅग्स :National Highway No. 6राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAkola cityअकोला शहर