शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : मुलगी, पत्नी, सासरच्या मंडळीने केली इसमाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 02:00 IST

अकोला : अकोट फैलाच्या शंकर नगरातील रहिवासी तसेच अनेक प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्या  इलीयास पटेल या इसमाची त्याची मुलगी, पत्नी व सासरच्या मंडळीने नववर्षाच्या पूर्वसंध्येला निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. पाच आरोपींनी इलीयास पटेल याची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह भौरद रोडवर निर्माणाधीन असलेल्या रेल्वे ओव्हर ब्रिजवर फेकला. या प्रकरणात अवघ्या काही तासातच अकोट फैल पोलिसांनी या हत्याकांडातील आरोपींना अटक केली आहे.

ठळक मुद्देअकोट फैलातील घटना; पाच गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोट फैलाच्या शंकर नगरातील रहिवासी तसेच अनेक प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्या  इलीयास पटेल या इसमाची त्याची मुलगी, पत्नी व सासरच्या मंडळीने नववर्षाच्या पूर्वसंध्येला निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. पाच आरोपींनी इलीयास पटेल याची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह भौरद रोडवर निर्माणाधीन असलेल्या रेल्वे ओव्हर ब्रिजवर फेकला. या प्रकरणात अवघ्या काही तासातच अकोट फैल पोलिसांनी या हत्याकांडातील आरोपींना अटक केली आहे.अनेक प्रकरणांमध्ये गुन्हेगार  असलेल्या इल्लू ऊर्फ इलियास हसन पटेल (३५, रा. शंकर नगर)  याला दारूचे व्यसन होते. तो दारूच्या नशेत असताना कुटुंबातील सदस्यांना त्रास देत होता. त्याला तीन मुली व एक मुलगा असून, सहा वर्षांपासून त्याची पत्नी मुलांसह माहेरी राहते.  त्याच्या १७ वर्षाच्या मुलीसह दोन्ही मुलींचा ताबा घेण्यासाठी नववर्षाच्या पूर्वसंध्येला तो पत्नी राहत असलेल्या ठिकाणी गेला; मात्र रात्रीच्या सुमारास सासरा शेख मोहम्मद शेख रन्नू, सासू शयदाबी शेख मोहम्मद, साळू गुलाम चांद गुलाम रियाझ, पत्नी शबाना परवीन इलीयास पटेल व मुलगी शबनम परवीन इलीयास पटेल या पाच जणांनी मिळून त्याच्यावर लोखंडी रॉडने आणि कुर्‍हाडीने हल्ला चढविला. या हल्ल्यात इल्लू ऊर्फ इलियास हसन पटेल याचा जागेवरच मृत्यू झाला. त्यानंतर मारेकर्‍यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतहेद भौरद येथील निमार्णाधीन पुलाजवळ नेऊन फेक ला. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना त्याचा मृतदेह दिसल्यानंतर त्यांनी अकोट फैल पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मृताच्या आईला घटनास्थळावर नेले असता, तिने मृतदेह मुलाचा असल्याचे ओळखले.  याप्रकरणी पोलिसांनी मृताचा सासरा, सासू व मृताची १७ वर्षाची मुलगी यांना ताब्यात घेतले. मुख्य आरोपी साळा हा फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी अकोट फैल पोलीस ठाण्यात मृताचा भाऊ अमीर हसन पटेल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शेख मो. शेख रन्नू (सासरा), शाहिदाबी शेख मोहम्मद (सासू), गुलाम चाँद गुलाम रियाज (साडू), शबाना परवीन इलियास (पत्नी) व १७ वर्षाची मुलगी यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात अकोट फैलचे ठाणेदार संजीव राऊत करीत आहेत.

हत्येचे कारण गुलदस्त्यातइलियास हा दारू पिऊन आला म्हणून हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र या हत्याकांडामागील कारण अद्याप गुलदस्त्यात असल्याची माहिती आहे. मुलगी व पत्नीने पित्याची हल्ला केल्याने सदर हत्येमागे दारूच्या व्यसनासोबतच आणखी दुसरे ठोस कारण असल्याची चर्चा आहे. मात्र, सोमवारी रात्री उशिरापर्यंत या हत्याकांडातील ठोस कारण समोर आले नाही. 

हत्याकांडातील दोघे फरारइलियास याच्या हत्याकांडात पोलिसांनी सासू, सासरे व पत्नीस अटक केली आहे. मात्र, मुख्य आरोपी त्याचा साळा फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तर मुलगी १७ वर्षीय असून, तिच्या अटकेसाठी पोलिसांनी प्रयत्न चालविले आहेत. अकोट फैल पोलिसांनी या प्रकरणातील तीन आरोपींना अटक केली आहे.

१५ दिवसांत पाच हत्याजिल्हय़ात गत १५ दिवसांच्या कालावधीत पाच हत्याकांड घडले. यामध्ये प्रशांत निंघोट, शैलेश अढाव, सुमन नक्षणे व कृषी नगरातील एका महिलेच्या डोक्यात पाटा घालून हत्या करण्यात आली होती, त्यानंतर सोमवारी पहाटेच इलियास याचे हत्याकांड समोर आल्याने गत १५ दिवसांमध्ये पाच हत्याकांड घडल्याचे दिसून येत आहे 

टॅग्स :Akola cityअकोला शहरMurderखूनCrimeगुन्हा