अकोला मनपा शिक्षकांची दिवाळी अंधारात ?

By Admin | Updated: October 17, 2014 01:21 IST2014-10-17T01:21:42+5:302014-10-17T01:21:42+5:30

सहा महिन्यांपासून वेतनच मिळाले नाही !

Akola Municipal teachers are in the dark of Diwali? | अकोला मनपा शिक्षकांची दिवाळी अंधारात ?

अकोला मनपा शिक्षकांची दिवाळी अंधारात ?

आशिष गावंडे/अकोला
महापालिका शिक्षकांचे वेतन ह्यऑनलाईनह्ण प्रणालीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये जमा केल्या जाणार असल्याच्या वल्गना हवेत विरल्या आहेत. शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे चक्क अकरा महिन्यांपासून ऑनलाईन प्रक्रिया रखडली. या प्रक्रियेचा अहवाल शिक्षण उ पसंचालकांनी शिक्षण संचालकांकडे (पुणे) अद्यापही पाठविला नसल्याची माहिती आहे. यामुळे वेतनाअभावी यंदाची दिवाळी शिक्षकांसाठी अंधारात जाण्याची दाट शक्यता आहे.
महापालिका शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकांचे वेतन त्यांच्या खात्यामध्ये ह्यऑनलाईनह्ण प्रणालीद्वारे जमा करण्याची प्रक्रिया नोव्हेंबर २0१३ मध्ये सुरू करण्यात आली. शालार्थ वे तनप्रणालीअंतर्गत ही प्रक्रिया शासनाने ठरवून दिलेल्या कालावधीत पार पडणे अपेक्षित होते. वेतन प्रक्रिया पूर्ण होण्याआधी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करणे क्रमप्राप्त होते. तसेच निर्देशही शिक्षण उपसंचालकांनी शिक्षण विभागाला दिले होते.
यामध्ये कला शिक्षकांची नियुक्ती, त्यांना अदा केलेल्या महागाई भत्त्यासह पाचव्या वेतन आयोगाच्या रकमेवर खुद्द शिक्षण उपसंचालक राम पवार यांनी आक्षेप नोंदविल्याने समायोजन नेमके कोणाचे करायचे, या मुद्यावर मनपा आयुक्तांसह शिक्षण विभागाने चालढकल केली. सरतेशेवटी नव्यानेच नियुक्त झालेल्या सहाय्यक शिक्षकांच्या समायोजनाच्या प्रस्तावाला शिक्षण उपसंचालकांनी मंजुरी दिली.
त्यानुसार ३0 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. समायोजनाची प्रक्रिया रखडल्याने ऑनलाईन प्रणालीची प्रक्रियासुद्धा थंडबस्त्यात पडली. परिणामी २९४ कार्यरत शिक्षकांचे चक्क एप्रिल महिन्यापासून वेतन अदा होऊ शकले नाही. शिक्षण विभागाने ३0 सप्टेंबरपूर्वी ऑनलाईन प्रणालीचा अहवाल शिक्षण उपसंचालकांकडे पाठविला असला तरी अमरावती कार्यालयाकडून हा अहवाल अद्यापही पुणे कार्यालयाला पाठविण्यात आला नसल्याची माहिती आहे. अर्थातच, दिवाळी सण तोंडावर असताना शिक्षकांना वेतन अदा होणार नसल्याने शिक्षकांच्या उत्साहावर विरजण पडण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.
मात्र ऑनलाईन प्रणालीचा अहवाल शिक्षण उपसंचालकांकडे पाठविण्यात आल्यामुळे दिवाळीपूर्वी डिमांड ड्राफ्टद्वारे शिक्षकांचे किमान दोन महिन्याचे वेतन प्राप्त होणार असल्याचे मनपाचे प्रभारी शिक्षण अधिकारी प्रदीप चोरे यांनी सांगीतले.

Web Title: Akola Municipal teachers are in the dark of Diwali?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.