अकोला मनपा कर्मचारी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर

By Admin | Updated: December 24, 2014 01:14 IST2014-12-24T01:14:45+5:302014-12-24T01:14:45+5:30

थकीत वेतनासाठी दिले निवेदन.

Akola Municipal staff stops collector's office | अकोला मनपा कर्मचारी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर

अकोला मनपा कर्मचारी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर

अकोला : सेवानवृत्त तसेच कार्यरत कर्मचार्‍यांचे वेतन व पाचव्या वेतन आयोगासह सहाव्या वेतन आयोगाची रक्कम अदा करण्यास प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत मनपा कर्मचारी संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी संघर्ष समितीच्यावतीने थकीत वेतनासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्यात आले.
मनपातील सेवानवृत्त तसेच कार्यरत कर्मचार्‍यांचे सहा महिन्यांचे वेतन थकीत आहे. पगारवाढ जुलै महिन्यात लागू न करता, डिसेंबर महिन्यात लागू करण्यात आली. पाचव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम, सहाव्या वेतन आयोगाची रक्कम अदा न करता, प्रशासन कर्मचार्‍यांच्या समस्यांची दखल घेण्यास तयार नाही. कालबद्ध पदोन्नतीची वेतन श्रेणी लागू करून फरकाची रक्कम त्वरित अदा करणे, रजा रोखीकरण, उपदानाची रक्कम सेवानवृत्त कर्मचार्‍यांना मुदतीच्या आत वाटप करणे तसेच पगारातून कपात केलेली रक्कम कर्मचार्‍यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची मागणी करीत मनपा कर्मचारी संघर्ष समितीने प्रशासनाच्या विरोधात एल्गार पुकारला आहे.

Web Title: Akola Municipal staff stops collector's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.