स्वच्छतेसाठी अकोला महापालिकेचा ‘मास्टर प्लॅन’
By Admin | Updated: October 28, 2014 00:59 IST2014-10-28T00:59:06+5:302014-10-28T00:59:06+5:30
नवीन वाहने, कंटेनर, साहित्याची होणार खरेदी.

स्वच्छतेसाठी अकोला महापालिकेचा ‘मास्टर प्लॅन’
आशिष गावंडे /अकोला
भाजप, शिवसेनेने महापालिकेची सत्तासूत्रे हातात घेतल्यानंतर व विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच सत्तापक्षाने स्वच्छतेच्या मुद्यावर ह्यमास्टर प्लॅनह्ण अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. साफसफाई व स्वच्छता राखण्यासाठी तेराव्या वित्त आयोगामार्फत प्राप्त चार कोटी रुपयांतून कचरा उचलण्यासाठी आधुनिक वाहने, कंटेनर, कॉम्पॅक्टर व इतर साहित्याची खरेदी केली जाईल. हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी प्रशासन व सत्तापक्ष कामाला लागल्याची माहिती आहे.
३६ प्रभागांपैकी तब्बल २0 प्रभाग पडीतच्या नावाखाली खासगी कंत्राटदारांना साफसफाईसाठी देण्यात आले आहेत. एका प्रभागासाठी १५ याप्रमाणे ६00 खासगी सफाई कर्मचारी दररोज स्वच्छता राखत असल्याचा दावा कंत्राटदार व संबंधित नगरसेवकांकडून केला जातो. उर्वरित १६ प्रभागांमध्ये आस्थापनेवरील ७४८ सफाई कर्मचारी सेवारत आहेत तसेच कचरा उचलण्यासाठी खासगी कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. अर्थात, स्वच्छतेच्या मुद्यावर महिन्याकाठी कोट्यवधींचा खर्च होत असला तरी अस्वच्छतेची समस्या कायम आहे. हे चित्र बदलण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी मध्यंतरी सफाई कर्मचार्यांची शोधमोहीम हाती घेतली होती. शहरातील अस्वच्छतेची समस्या लक्षात घेता, सत्ताधारी भाज प, शिवसेनेने यावर ठोस तोडगा काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या. कचरा उचलण्यासाठी प्रत्येक प्रभागाकरिता आधुनिक वाहन, प्रभागात कचरा साठवणुकीसाठी २00 कंटेनर व वाहून नेण्यापूर्वी त्यावर दाब देण्यासाठी किमान चार ह्यकॉम्पॅक्टरह्णमशीनची खरेदी केली जाणार आहे. सद्य:स्थितीत मनपाकडे चार नवीन वाहने असून, येत्या दीड महिन्यांच्या कालावधीत आणखी नऊ वाहने व त्यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण प्रभागांसाठी वाहने खरेदी केली जातील.
* वेळ, श्रम व पैसा वाचण्यास मदत
नागरिकांना कचरा साठवणुकीसाठी प्रत्येक प्रभागात किमान पाच किंवा सहा कंटेनर उ पलब्ध करून दिले जातील. सध्या कचर्याच्या एका ढिगालाच ट्रॅक्टर तुडुंब भरतो. कॉम्पॅ क्टरमुळे किमान पाच कंटेनरमधील कचर्यावर दाब दिल्यास केवळ एका वाहनातून तो वाहून नेला जाईल.