अकोला मनपावर ४७३ कोटींचा बोजा

By Admin | Updated: April 17, 2015 01:57 IST2015-04-17T01:57:44+5:302015-04-17T01:57:44+5:30

‘मजीप्रा’च्या व्याजाचा आलेख चढताच.

Akola Municipal Corporation's burden of 473 crores | अकोला मनपावर ४७३ कोटींचा बोजा

अकोला मनपावर ४७३ कोटींचा बोजा

आशिष गावंडे / अकोला: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या ७८ कोटी थकबाकीचा आकडा फुगत जाऊन ४00 कोटी ३३ लाखांवर पोहोचला. वेतनासाठी शासनाकडून घेण्यात आलेले १६ कोटी रुपये व महापालिका कर्मचार्‍यांचे वेतन, विविध भत्त्यांची थकीत रक्कम लक्षात घेता महापालिकेवर ४७३ कोटी ८१ लाखांचा बोजा कायम असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. विशेष म्हणजे मजीप्राच्या व्याजाचा आलेख वर्षागणिक वाढत असताना यावर ठोस निर्णय घेताना मनपा प्रशासन कुचराई करीत आहे. अकोला शहराची पाणीपुरवठा योजना २00७ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून मनपाने हस्तांतरित केली. त्यावेळी ७८ कोटी रुपये मजीप्राला देणे भाग होते. एवढय़ा मोठय़ा रकमेची जुळवाजुळव करणे शक्य नसल्याने ही रक्कम अदा करणे मनपाला शक्य झाले नाही. मागील आठ वर्षांमध्ये मजीप्राच्या थकीत रकमेच्या बदल्यात व्याजाचा आलेख मात्र झपाट्याने वाढला. आजरोजी ही रक्कम ४00 कोटींवर पोहोचली. कर्मचार्‍यांचे नियमित वेतन अदा करण्याची कुवत नसलेल्या महापालिकेकडून एवढी मोठी रक्कम अदा करणे होईल का, असा प्रश्न आहे. या परिस्थितीची जाणीव असल्यामुळे की काय, प्रत्येक वर्षाला बोजा चढणार्‍या व्याजाच्या रकमेवर मनपा प्रशासनानेदेखील चूप्पी साधली आहे. कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी सन २0१0 मध्ये शासनाकडून १६ कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले होते. याबदल्यात प्रत्येक महिन्याला दहा लाख रुपये शासनाकडे जमा केले जातात. महापालिक ा कर्मचार्‍यांच्या वेतनासह पाचव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम, सेवानवृत्त कर्मचार्‍यांचे वेतन, रजा रोखीकरण, नवृत्ती वेतन अंशदान, जलप्रदाय विभागातील थकबाकी, सेवानवृत्त तथा कार्यरत शिक्षकांचे वेतन, महावितरण कंपनी, पाटंबधारे विभागाची कोट्यवधीची रक्कम थकीत आहे. ही सर्व थकबाकी ४७३ कोटींपर्यंत पोहोचली आहे. मजीप्राची रक्कम वजा केल्यास इतर थकबाकीचा निपटारा करण्यासाठी मनपाला ७३ कोटी ८१ लाखांची आवश्यकता आहे.

Web Title: Akola Municipal Corporation's burden of 473 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.