शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

‘त्या’ तीन जागांसाठी महापालिकेला द्यावे लागतील ३० कोटी रुपये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 12:31 IST

तीनही जागांच्या बदल्यात महापालिकेला शासनाकडे ३० कोटी रुपये जमा करावेच लागतील, अशी भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतल्यामुळे मनपाने ३० कोटी रुपये टप्प्या-टप्प्याने अदा करण्याचा निर्णय घेतला आहे.

- आशिष गावंडेअकोला: शहराच्या मध्यभागी असलेल्या जनता भाजी बाजार तसेच टॉवर चौकातील जुन्या बसस्थानकाच्या जागेवर कमर्शियल कॉम्प्लेक्स उभारण्यासह गांधी जवाहर बगीचालगत असणाºया मैदानावर आॅडिटोरिअम हॉलचे निर्माण केले जाणार आहे. या तीनही जागांच्या बदल्यात महापालिकेला शासनाकडे ३० कोटी रुपये जमा करावेच लागतील, अशी भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतल्यामुळे मनपाने ३० कोटी रुपये टप्प्या-टप्प्याने अदा करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे नियोजन करीत महापौर विजय अग्रवाल, मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे.महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक स्थितीत सुधार व्हावा, यासाठी महापौर विजय अग्रवाल यांनी शहरातील निवडक आरक्षित जागांवर कमर्शियल कॉम्प्लेक्स उभारण्याचा प्रस्ताव तयार केला. शहरात विविध ठिकाणी महापालिकेच्या मालकीच्या जागा असून, त्यावर उभारण्यात आलेल्या व्यावसायिक संकुलांपासून प्रशासनाला महसूल प्राप्त होतो. शहरातील जनता भाजी बाजाराच्या जागेवर कमर्शियल कॉम्प्लेक्स व भाजी बाजाराचे आरक्षण आहे. जुने बसस्थानकाच्या जागेवर सिटी बसस्थानक व व्यावसायिक संकुलाचे आरक्षण आहे. गांधी जवाहर बागेलगतच्या मैदानावर आॅडिटोरिअम हॉलचे आरक्षण आहे. या तीन जागांचा विकास करण्यासाठी महापौर विजय अग्रवाल सरसावल्याचे चित्र आहे.मनपाचे आर्थिक नियोजनसदर जागा ताब्यात घेण्याच्या बदल्यात मनपाला ३० कोटी रुपये जमा करावे लागतील. हा पैसा टप्प्या-टप्प्याने जमा करण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आला असून, निविदा प्रकाशित करण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी कधी मुहूर्त सापडतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पक्षांतर्गत गटबाजी; निविदा रखडली!भाजपातील गटबाजी जगजाहीर असली तरी त्याचा परिणाम विकास कामांवर होत असल्याचे चित्र आहे. या तीन जागांवर उभारल्या जाणाऱ्या वास्तूंमुळे शहराच्या विकासात भर पडणार आहे. पक्षांतर्गत गटबाजीतून जिल्हा प्रशासनावर दबावतंत्राचा वापर होत असल्यामुळे निविदा प्रक्रियेला विलंब होत असल्याची माहिती आहे. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने ३० कोटींचे नियोजन करण्याचे निर्देश मनपाला दिल्याचे बोलल्या जाते.

जुने बसस्थानकआरक्षण क्रमांक १०३, वाणिज्य संकुल व सिटी बसस्थानकएकूण क्षेत्रफळ- १ लाख ४ हजार ७५ चौरस फूटजमा होणारी रक्कम- ७ कोटी ३९ लाख ९३ हजारजनता भाजी बाजारआरक्षण क्रमांक २०३, वाणिज्य संकुल व भाजी बाजारएकूण क्षेत्रफळ- २.४७ हेक्टर आरजमा होणारी रक्कम- १८ कोटी ८० लाख ३५ हजार 

आॅडिटोरिअमआरक्षण क्रमांक १९८, आॅडिटोरिअमची उभारणीजमा होणारी रक्कम- ३ कोटी ७ लाख २ हजार* नवीन प्रशासकीय इमारतनझूल शिट क्रं. ५२, प्लॉट नं. ११/१ जि.प. उर्दू शाळाएकूण क्षेत्रफळ- २ लाख ७५ हजार २०१ चौरस फूटशासनाकडून प्राप्त निधी- १० कोटी रुपयेनवीन इमारतीसाठी रक्कम माफीचा प्रस्तावजिल्हा परिषदेंतर्गत उर्दू शाळेच्या जागेवर मनपाची नवीन प्रशासकीय इमारत उभारली जाणार आहे. खासदार संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाने १० कोटी मंजूर केले. या जागेच्या बदल्यात मनपाला शासनाकडे ५ कोटी ८८ लाख रुपये जमा करण्याची अट असून, महापौर विजय अग्रवाल यांनी ही रक्कम माफ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. 

जनता भाजी बाजार, जुने बसस्थानक व गांधी जवाहर उद्यानलगतच्या जागेसाठी शासनाकडे ३० कोटी रुपये टप्प्या-टप्प्याने अदा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. उपरोक्त तीनही जागांचा विकास झाल्यास मनपाला कायमस्वरूपी उत्पन्न प्राप्त होईल.- विजय अग्रवाल,महापौर.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका