शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

महापालिकेचा बिंदुनामावलीचा प्रस्ताव शासनाकडे; मनपा प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2020 10:46 AM

Akola Municipal Corporation: बिंदुनामावलीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला आहे.

- आशिष गावंडे लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकेतील रिक्त पदांचा अनुशेष दूर करणे व सरळ सेवा पदभरती व पदोन्नतीचा मार्ग मोकळा करण्याच्या उद्देशातून प्रशासनाने ‘अ’ आणि ‘ब’ श्रेणीतील बिंदुनामावलीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला आहे. ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर केला असून, या दोन्ही प्रस्तावांना मान्यता कधी मिळते, याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे.महापालिकेतील बिंदुनामावली व आकृतिबंध अद्ययावत नसल्यामुळे प्रशासकीय कामकाज प्रभावित झाल्याची परिस्थिती आहे. मनपाच्या आस्थापनेवर एकूण कर्मचाऱ्यांची संख्या व उपलब्ध मनुष्यबळाची तफावत ध्यानात घेऊन, कार्यरत कर्मचारी नेमके आहेत तरी किती, याची इत्थंभूत माहिती सामान्य प्रशासन विभागाकडे उपलब्ध नसल्यामुळे सर्वत्र गोंधळाची स्थिती आहे. यावर उपाय म्हणून शासनाने महापालिकेला आकृतिबंध तयार करण्याचे निर्देश दिले होते, तसेच बिंदुनामावली अद्ययावत करण्याची सूचना केली होती. दरम्यान, २०१९ मध्ये मराठा आरक्षण लागू झाले. मराठा आरक्षण लागू झाल्यामुळे सुधारित बिंदुनामावलीचा प्रस्ताव तयार करण्यासाठी महापालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या होत्या. यामध्ये जानेवारी महिन्यात ‘अ’, ‘ब’ श्रेणीतील कर्मचाºयांच्या बिंदुनामावलीचा प्रस्ताव नगर विकास विभागाकडे सादर करण्यात आला होता.सदर प्रस्ताव नगर विकास विभागाने सामान्य प्रशासन विभागाकडे सादर केल्याची माहिती आहे. दुसरीकडे ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील कर्मचाºयांचा प्रस्ताव मनपाने विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर केला आहे. सदर प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर मनपातील पदभरतीचा मार्ग मोकळा होईल.

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAkolaअकोला