शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

महापालिकेची बोळवण; ‘डीआयटी’कडून अर्धवट माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 3:27 PM

महापालिका प्रशासनाने पत्रव्यवहार केल्यानंतर ‘डीआयटी’ने मनपाला चक्क अर्धवट माहिती सादर केल्याची माहिती आहे.

अकोला : मोबाइल कंपन्यांना फोर-जी सुविधेसाठी फायबर आॅप्टिक केबल टाकण्याची परवानगी देणाºया राज्याच्या तंत्रज्ञान व माहिती संचालनालयाकडे (डीआयटी) महापालिका प्रशासनाने पत्रव्यवहार केल्यानंतर ‘डीआयटी’ने मनपाला चक्क अर्धवट माहिती सादर केल्याची माहिती आहे. मनपाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविणाºया मोबाइल कंपन्यांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी प्रशासन कामाला लागले असतानाच शासनाच्या संबंधित विभागाकडून महापालिकेची बोळवण केली जात असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मनपा आयुक्त संजय कापडणीस काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मनपा प्रशासनाची दिशाभूल तसेच फसवणूक करीत देशातील सर्वात मोठ्या मोबाइल कंपनीने विनापरवानगी शहराच्या कानाकोपºयात खोदकाम करून फोर-जीसाठी अनधिकृत फायबर आॅप्टिक केबलचे जाळे टाकल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उजेडात आणला. या गंभीर प्रकरणाची दखल घेत केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी सखोल चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्याचे प्रशासनाला निर्देश दिले. त्यानुषंगाने मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी अनधिकृत भूमिगत केबल, विनापरवानगी उभारलेले मोबाइल टॉवर, अनधिकृत ‘ओव्हरहेड केबल’ शोधून काढण्याची कारवाई केली. मनपाच्या तपासणीत ‘त्या’कंपनीने अनधिकृत केबल तसेच तब्बल चार-चार पाइप टाकल्याचे आढळून आले आहे. प्रशासनाच्या कारवाईची धास्ती घेतलेल्या मोबाइल कंपन्यांनी ‘दमडी’ वाचवण्यासाठी धावपळ सुरू केली असली तरी दुसरीकडे मनपाच्या कारवाईत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे अडथळा निर्माण करण्याचे कामही केल्या जात असल्याची माहिती आहे. संबंधित मोबाइल कंपन्यांना फायबर आॅप्टिक केबल, मोबाइल टॉवर तसेच ‘ओव्हरहेड’केबल टाकण्याची परवानगी राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाकडून दिली जात असल्यामुळे आयुक्त कापडणीस यांनी संबंधित विभागाला पत्र पाठवून माहिती मागितली. ‘डीआयटी’कडून अर्धवट माहिती प्राप्त झाल्याने प्रशासन बुचकळ््यात पडले आहे.आयुक्तांच्या पाठपुराव्याकडे लक्षमनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी दंडाची रक्कम जमा करण्यासंदर्भात संबंधित मोबाइल कंपन्यांना वारंवार सूचना दिल्या आहेत. ‘डीआयटी’कडून मिळणारी अर्धवट माहिती व मोबाइल कंपन्यांची आडमुठेपणाची भूमिका पाहता आयुक्त कापडणीस यांच्या पाठपुराव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘डीआयटी’कडून सहकार्याची अपेक्षाकेंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांच्याकडे माहिती व तंत्रज्ञान तसेच दूरसंचार विभागाचे खाते आहे. ना. धोत्रे यांच्या गृह शहरात मनपाची फसवणूक करणाऱ्या मोबाइल कंपन्यांना ‘डीआयटी’ मार्फत परवानगी मिळाली आहे. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता ‘डीआयटी’कडून मनपाला सहकार्याची अपेक्षा आहे. यासंदर्भात ना. संजय धोत्रे यांनी निर्देश दिल्यास मनपाचा पुढील कारवाईचा मार्ग मोकळा होणार असल्याचे बोलल्या जात आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका