शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
3
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
4
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
5
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
6
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
7
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
8
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
9
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
10
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
11
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
12
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
13
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
14
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
15
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
16
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
17
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
18
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
19
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
20
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 

अकोला महापालिका दिव्यांगांना देणार प्रतिमहा ६०० आणि ८०० रुपये अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 4:15 PM

अकोला : महानगरपालिकेच्या महासभेने मंजुरी दिल्याप्रमाणे अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नोंदणीकृत दिव्यांगांना वर्गवारीनुसार ६०० आणि ८०० रुपये प्रतिमहा अनुदान दिले जाणार आहे.

अकोला : महानगरपालिकेच्या महासभेने मंजुरी दिल्याप्रमाणे अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नोंदणीकृत दिव्यांगांना वर्गवारीनुसार ६०० आणि ८०० रुपये प्रतिमहा अनुदान दिले जाणार आहे. यासाठी अकोल्यातील दिव्यांगांनी तातडीने नोंदणी करावी, असे आवाहन अकोला मनपाचे महापौर विजय अग्रवाल यांनी केले आहे.दिव्यांग म्हणून नोंदणीकृत असलेल्या १० वर्षांवरील दिव्यांगास ६०० रुपये प्रतिमहा आणि ज्येष्ठ दिव्यांग असलेल्यास ८०० रुपये प्रतिमाह अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचा अकोल्यातील दिव्यांगांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सदर योजनेचा लाभ घेताना दिव्यांग व्यक्ती इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभार्थी असला, तरी त्यास अनुदान दिले जाईल. सोबतच दिव्यांग व्यक्तीच्या विवाह झालेल्या पती-पत्नीला (सुदृढ) घर-संसारोपयोगी वस्तू खरेदी करण्याकरिता १० हजारांची मदतही दिली जाणार आहे. थेट लाभार्थीच्या बँक खात्यात ही रक्कम टाकण्यात येणार आहे, तरी अकोला महानगरपालिका क्षेत्रातील लाभार्थींनी पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, दिव्यांग प्रमाणपत्र आणि विहित नमुन्यात अर्ज भरून महापालिकेच्या दिव्यांग कक्ष, कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महापौर विजय अग्रवाल यांनी केले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका