अकोला मनपाचे २४0 कोटींचे अंदाजपत्रक मंजूर
By Admin | Updated: July 10, 2014 01:29 IST2014-07-10T01:15:38+5:302014-07-10T01:29:31+5:30
विशेष सभेत महापौरांची हिरवी झेंडी; १५ कोटी ९४ लाखांच्या शिलकीचे अंदाज पत्रक

अकोला मनपाचे २४0 कोटींचे अंदाजपत्रक मंजूर
अकोला : महापालिका आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सन २0१४-१५ या आर्थिक वर्षाचा १५ कोटी ९४ लाखांच्या शिलकीसह २४0 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. बजेटमध्ये ८ कोटींची वाढ सुचवित २४0 कोटींच्या अर्थसंकल्पाला महापौर ज्योत्स्ना गवई यांनी बुधवारी विशेष सभेत मंजुरी दिली. विशेष म्हणजे, स् थायी समिती अस्तित्वात नसल्यामुळे हा अर्थसंकल्प प्रशासनाने थेट विशेष सभेत सादर केला.
मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केवळ आकडे मोठे करण्यासाठी फुगवून अर्थसंकल्प सादर करण्यापेक्षा संभाव्य प्राप्त उत्पन्नाच्या बाबी विचारात घेत, उत्पन्न व खर्चाचा हिशेब मांडला. त्यांनी अकोलेकरांवर कोणताही नवीन कर लादला नाही. महापालिकेला एलबीटीचा (स्थानिक संस्था कर) फटका बसल्याचे प्रशासनाने कबूल केले. त्यामुळे उत्पन्नाचा आलेख काहीअंशी घसरला. सन २0१४-१५ चे पहिल्या चार महिन्याकरिता ३५ कोटी ३0 लाख ५२ हजारचे जिल्हाधिकार्यांमार्फत लेखा अनुदान मंजूर करीत मनपाचे दैनंदिन कामकाज सुरू असल्याचे आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. मार्चच्या शेवटपर्यंत एलबीटीपासून ५५ कोटी रुपये उत्पन्न होण्याची शक्यता आयुक्तांनी वर्तविली. आयुक्त कल्याणकर यांनी अर्थसंकल्प सादर करताना अप्रत्यक्षपणे फुगीर अर्थसंकल्प सादर करणार्या सत्ताधार्यांवर नेम साधला. आयुक्त म्हणाले, आपण पुढील वर्षीचे उत्पन्न विचारात घेऊनच नियोजन केले आहे. उत्पन्नात वाढ कमी आहे. त्यामुळे आपण अ र्थसंकल्पात वस्तुस्थिती दर्शविली, असे सांगत आयुक्तांनी अप्रत्यक्षपणे अवास्तव अर्थसंकल्प मांडणार्या सत्तापक्षाला चिमटे काढले. ह्यजीआयएसह्ण प्रकल्पाद्वारे मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करणे, अवैध नळ जोडणीधारकांसह शक्य झाल्यास अनधिकृत बांधकामांना तीनपट दंड आकारणे आदी बाबीतून मनपाच्या उत्पन्नात वाढ करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. मनपाच्या एकूण २0३ कोटींच्या उत् पन्नातून २४0 कोटींच्या खर्चाची आकडेवारी आयुक्तांनी सभागृहात सादर केली. यामध्ये वर्षाअखेरीस १५ कोटी ९४ लाखांची शिल्लक रक्कम दर्शविण्यात आली. सत्तापक्षाच्यावतीने भारिप-बमसंचे गटनेता गजानन गवई यांनी विभागनिहाय उत्पन्न व खर्चाचा आढावा घेत त्यामध्ये ८ कोटींच्या दुरुस्त्या सुचविल्या. महापौर ज्योत्स्ना गवई यांनी सर्वानुमते २४0 कोटींच्या बजेटला मंजुरी दिली.
असा येईल रुपया (वर्ष २0१४-१५)
एलबीटी - ५५ कोटी
मालमत्ता कर - १७ कोटी ५0 लाख
पाणीपट्टी - ६ कोटी
बाजार - ६0 लाख
विकास शुल्क - ४ कोटी
इमारत भाडे - ३५ लाख
गुंठेवारीपासून उत्पन्न - ५0 लाख
४अनुदाने व अंशदान - १२ कोटी १५ लाख
४जमीन भाडे उत्पन्न - ३0 लाख
४संकर्ण - ५६ लाख
अशा आहेत तरतुदी
सार्वजनिक बांधकाम विभाग - १0 कोटी
विद्युत व्यवस्था - ५ कोटी ३३ लाख
आरोग्य सुविधा - २२ लाख
जलप्रदाय विभाग - ६ कोटी
साफसफाई - ४ कोटी ७५ लाख
शिक्षण विभाग - ६५ लाख
वेतनावर होणारा खर्च
सार्वजनिक बांधकाम विभाग -३ कोटी २0 लाख
विद्युत व्यवस्था -५ कोटी ३२ लाख
आरोग्य सुविधा -१ कोटी ५0 लाख
जलप्रदाय विभाग - ४ कोटी
साफसफाई -१0 कोटी ५0 लाख