अकोला महापालिका आयुक्तांची बदली

By Admin | Updated: September 1, 2015 02:04 IST2015-09-01T02:04:30+5:302015-09-01T02:04:30+5:30

कामठी नगर पालिकेत मुख्याधिकारीपदी नियुक्ती; जिल्हाधिका-यांकडे सोपविला प्रभार.

Akola Municipal Commissioner replaced | अकोला महापालिका आयुक्तांची बदली

अकोला महापालिका आयुक्तांची बदली

अकोला: महापालिका आयुक्त सोमनाथ शेटे यांची कामठी नगर पालिकेच्या मुख्याधिकारीपदी बदली झाली. सोमवारी नगर विकास विभागाने त्यांच्या बदलीचे आदेश जारी केले. अवघ्या सात महिन्यात शेटे यांची बदली झाल्याने रिक्त झालेल्या अकोला मनपा आयुक्त पदाचा प्रभार तूर्तास जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.वर्धा नगर पालिकेच्या मुख्याधिकारीपदी असलेले सोमनाथ शेटे यांनी ११ फेब्रुवारी रोजी मनपा आयुक्त पदाची सूत्रे सांभाळली होती. अवघ्या सात महिन्यातच शेटे यांची बदली करण्यात आली. नागपूर जिल्ह्यातील कामठी नगर पालिकेच्या मु ख्याधिकारी पदावर सोमनाथ शेटे यांच्या नियुक्तीचे आदेश नगर विकास विभागाने दिले आहे. महापालिकेच्या आयुक्त पदाचा प्रभार जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्याकडे सो पविण्यात आला.

Web Title: Akola Municipal Commissioner replaced