अकोला मनपाच्या ३२४ शिक्षकांचे वेतन थकीत

By Admin | Updated: June 30, 2014 01:53 IST2014-06-30T00:51:46+5:302014-06-30T01:53:29+5:30

शिक्षक अडचणीत: उर्दू शिक्षक संघटनेचे अकोला महानगरपालिका आयुक्तांना निवेदन.

Akola MPs are worried about the wages of 324 teachers | अकोला मनपाच्या ३२४ शिक्षकांचे वेतन थकीत

अकोला मनपाच्या ३२४ शिक्षकांचे वेतन थकीत

अकोला: महानगरपालिका अंतर्गत कार्यरत ३२४ शिक्षकांचे गेल्या सहा महिन्यांचे वेतन थकीत असल्याने शिक्षक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे शिक्षकांचे थकीत असलेले वेतन तातडीने देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेच्या मनपा शाखेच्यावतीने मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून मनपाच्या ३२४ शिक्षकांना वेतन मिळाले नसल्याने वे तनाअभावी शिक्षक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. येत्या ३0 जूनपासून रमजान महिना सुरू होत असून, मनपा शिक्षकांचे थकीत वेतन तातडीने देण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय शिक्षकांच्या वेतनातून कपात करण्यात आलेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम शिक्षकांच्या खात्यात वळती करण्यात यावी, शिक्षक डॉ. ख्वॉजा नईमोद्दीन यांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती देण्यात यावी, सहाव्या वेतन आयोगाची शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधीची तीन टप्प्यांची थकबाकीची रक्कम जमा करण्यात यावी आणि मनपा शिक्षकांचे ऑनलाईन प्रणालीप्रमाणे देण्यात यावे, अशा मागण्यादेखील उर्दू शिक्षक संघटनेच्यावतीने मन पा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. निवेदनावर संघटनचे अध्यक्ष मगफूर अहेमद व कार्याध्यक्ष खान सरदार खान यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Web Title: Akola MPs are worried about the wages of 324 teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.