अकोल्याचे खासदार संजय धोत्रे झाले विधीज्ञ; प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 15:04 IST2018-06-15T15:04:34+5:302018-06-15T15:04:34+5:30

अकोला: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या विधी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी असलेले तसेच अकोल्याचे खा. संजय धोत्रे यांनी विधी अभ्यासक्रमात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन विधीज्ञांची पदवी मिळविली आहे.

 Akola MP Sanjay Dhotre become advocate | अकोल्याचे खासदार संजय धोत्रे झाले विधीज्ञ; प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

अकोल्याचे खासदार संजय धोत्रे झाले विधीज्ञ; प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

ठळक मुद्देधोत्रे यांनी खासदारकीच्या अत्यंत व्यस्त कार्यकाळातही एलएल. बीच्या प्रथम वर्षाला गत तीन वर्षांपूर्वी प्रवेश घेतला होता. सहा सेमिस्टरमध्येच त्यांनी विधी अभ्यासक्रमाची पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली आहे. खा. संजय धोत्रे यांनी वयाच्या ५५ व्या वर्षी विधी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, हे विशेष

अकोला: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या विधी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी असलेले तसेच अकोल्याचे खा. संजय धोत्रे यांनी विधी अभ्यासक्रमात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन विधीज्ञांची पदवी मिळविली आहे. विधी अभ्यासक्रमाचा निकाल गुरुवारी जाहीर झाला असून, यामध्ये खा. धोत्रे हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
पळसो बढे येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुणे विद्यापीठातून अभियांत्रिक ीचे शिक्षण प्रथम श्रेणीत पूर्ण करणारे अकोल्याचे खा. संजय श्यामराव धोत्रे यांनी खासदारकीच्या अत्यंत व्यस्त कार्यकाळातही एलएल. बीच्या प्रथम वर्षाला गत तीन वर्षांपूर्वी प्रवेश घेतला होता. तीन वर्षांच्या विधी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर सहा सेमिस्टरमध्येच त्यांनी विधी अभ्यासक्रमाची पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली आहे. अकोल्याचे खासदार आता स्वत:च विधीज्ञ झाल्याने अनेक कायदेशीर बाबींवर त्यांचे मार्गदर्शन जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार, यात शंका नाही. खा. संजय धोत्रे यांनी वयाच्या ५५ व्या वर्षी विधी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. हे विशेष

Web Title:  Akola MP Sanjay Dhotre become advocate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.