शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

अकोला शहराची 'एज्युकेशन हब'च्या दिशेने वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 13:29 IST

अकोला: ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा जोपासत अकोला शहर विदर्भातील मोठे शैक्षणिक हब होऊ पाहत आहे.

ठळक मुद्देउच्च शिक्षणासाठी पुणे नंतर अकोल्याला पालकांची पसंती मिळत आहे.सर्वच मोठ्या शहरांना जोडलेले हे शहर व्यापारी दृष्टिकोनातून मोठी बाजारपेठ आहे. पारंपरिक संस्कृतीचे जतन घराघरात होत असल्याने पाश्चात्य संस्कृतीचा पगडा जास्त नाही

अकोला: ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा जोपासत अकोला शहर विदर्भातील मोठे शैक्षणिक हब होऊ पाहत आहे. गत काही वर्षात बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या त्याची साक्ष देत आहेत. अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा अन् सर्वसामान्य कुटुंबाला परवणाºया खर्चात उत्तम शिक्षणाची संधी आणि पाल्यांच्या सुरक्षिततेची हमी या मिळत असल्याने उच्च शिक्षणासाठी पुणे नंतर अकोल्याला पालकांची पसंती मिळत आहे.अकोला हे विदर्भातले तिसºया क्रमांकाचे मोठे शहर आहे. रेल्वे, महामार्ग आणि विमानसेवेने सर्वच मोठ्या शहरांना जोडलेले हे शहर व्यापारी दृष्टिकोनातून मोठी बाजारपेठ आहे. शिवाय, मेडिकल हब म्हणूनही शहराचा विकास होत आहे. त्यामुळे आवश्यक सर्वच सुविधा उपलब्ध आहेत. मध्यमवर्गीयांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांसाठी शहरात पोषक वातावरण निर्माण झाले आहे.येथून येतात सर्वाधिक विद्यार्थीबुलडाणा, वाशिम, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूरम्हणून अकोला सुरक्षित...पारंपरिक संस्कृतीचे जतन घराघरात होत असल्याने पाश्चात्य संस्कृतीचा पगडा जास्त नाही. शिवाय, विद्यार्थी ज्यांच्याकडे भाड्याने राहतो, त्या कुटुंबाचे थेट विद्यार्थ्यांवर लक्ष असते. विशेषत: शैक्षणिक संस्थांच्या परिसरातच विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था आणि ग्रंथालयांची सुविधा असल्याने विद्यार्थी इतरत्र भरकटण्याची शक्यता कमी.विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातूनकाही विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता, त्यांनी येथील शैक्षणिक संस्थांच्या विश्वासार्हतेमुळे अकोल्यात शिक्षणासाठी आल्याचे सांगितले. या शिवाय, शहरात व्यसनाधीनतेचे प्रमाण कमी असून, शिक्षक तसेच ज्या ठिकाणी रूम करून राहतो, त्या ठिकाणी घरच्यासारखे वातावरण मिळत असल्याचेही यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे शैक्षणिक संस्थांच्या परिसरातच राहायला घर आणि वाचनालयांची उपलब्धता असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे खर्चाच्या तुलनेत शहर परवडणारे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.शहरात उपलब्ध अभ्यासक्रम

  • शैक्षणिक अभ्यासक्रम
  • बारावी विज्ञान शाखा
  • पीएमटी, पीईटी, जेईईई, नीट, सीईटी
  • बीएससी, संगणक, कृषी, अभियांत्रिकी, स्थापत्य अभियंत्रिकी, वाणिज्य (सीए, सीएस), विधी, कला या व्यतिरिक्त कोटा पॅटर्न इत्यादी

स्पर्धा परीक्षा

  • बँकिंग
  • राज्यसेवा
  • पीएसआय, एसटीआय, असिस्टंट
  • तलाठी, पोलीस भरती (मैदानी चाचणी प्रशिक्षण)

कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमपारंपरिक शिक्षणासोबतच कौशल्यावर आधारित व्यावसायिक शिक्षणाच्याही संधी शहरात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. विशेषत: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुली), या माध्यमातून मुलींना कौशल्यपूर्ण शिक्षण आणि त्यातून करिअरच्या संधी निर्माण करणे शक्य आहे. शिवाय, शासकीय नोकरी व इतर आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळू शकते. या मध्ये प्रामुख्याने पुढील अभ्यासक्रमाचा समावेश आहे.फॅशन डिझाइन अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजीबेकर अ‍ॅन्ड कन्फेक्शनरीबेसिक कॉस्मोटोलॉजीफूड प्रोसेसिंगइतर महत्त्वाचे अभ्यासक्रमटू डी, थ्रीडी अ‍ॅनिमेशनअ‍ॅटोकॅडएटीडी

 

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्र