शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

अकोला : शिवजयंतीच्या सहभागासाठी मोटारसायकल रॅली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 2:31 AM

अकोला : सोमवार, १९ फेब्रुवारी रोजी होणार्‍या शिवजयंतीमध्ये सर्व जाती-धर्माच्या लोकांचा सहभाग नोंदविण्यासाठी रविवारी महानगरातून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. मोटारसायकलींवर लावलेले भगवे ध्वज आणि भगवे फेटे बांधून निघालेल्या युवक-युवतींच्या या रॅलीने अकोलेकरांचे लक्ष वेधून घेतले होते. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने प्रथमच अशा प्रकारची भव्य रॅली काढण्यात आली.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सोमवार, १९ फेब्रुवारी रोजी होणार्‍या शिवजयंतीमध्ये सर्व जाती-धर्माच्या लोकांचा सहभाग नोंदविण्यासाठी रविवारी महानगरातून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. मोटारसायकलींवर लावलेले भगवे ध्वज आणि भगवे फेटे बांधून निघालेल्या युवक-युवतींच्या या रॅलीने अकोलेकरांचे लक्ष वेधून घेतले होते. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने प्रथमच अशा प्रकारची भव्य रॅली काढण्यात आली.स्थानिक आकाशवाणीसमोरच्या जिल्हा परिषद कर्मचारी भवनासमोरून मोटारसायकल रॅलीस प्रारंभ झाला. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी या रॅलीचे उद्घाटन भगवे ध्वज दाखवून केले. त्यानंतर ही रॅली आकाशवाणी समोरून दुर्गा चौक, स्कायलार्क समोरून टॉवर चौक, धिंग्रा चौक, महापालिका कार्यालयाजवळून जिल्हाधिकारी कार्यालय, अशोक वाटिका जवळून तुकाराम चौक, कौलखेड, गोरक्षण मार्गावरून ही रॅली पुन्हा नेहरू पार्क चौकातून आकाशवाणीसमोरच्या जिल्हा परिषद कर्मचारी भवनात पोहोचली. सकाळी १0 वाजतापासून सुरू झालेली रॅली दुपारी १ वाजता संपुष्टात आली. भगवे ध्वज घेऊन निघालेल्या युवक-युवतींच्या मोटारसायकल रॅलीने अकोलेकरांचे लक्ष वेधून घेतले होते. जवळपास १७00 मोटारसायकली या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. 

रांगोळी-पुष्पवृष्टीने रॅलीचे स्वागतमोटारसायकल रॅलीच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी रांगोळी आणि पुष्पवृष्टी करण्यात येत होती. कौलखेड परिसरात रॅलीचे जोरदार स्वागत झाले. रॅली कौलखेड परिसरात येताच फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. सोबतच २५ किलो गुलाबपुष्पाच्या पाकळ्यांची उधळण येथे सारखी सुरू राहिली. त्यामुळे रॅलीत सहभागी झालेल्यांचा उत्साह द्विगुणित झाला होता.

माँ जिजाऊ, बाल शिवाजींचे आकर्षणमाँ जिजाऊ  आणि बाल शिवाजींच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या कलावंतांनी या मोटारसायकल रॅलीची शोभा वाढविली होती. हेमलता भालतिलक या युवतीने माँ जिजाऊंची वेशभूषा केली होती.

टॅग्स :Akola cityअकोला शहर