शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अकोला मनपा प्रशासनाने काढलेल्या नऊ कोटींच्या निविदांवर कंत्राटदारांचा बहिष्कार कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 13:54 IST

अकोला : प्रशासनाने तांत्रिक मुद्दे निकाली काढावे; अन्यथा बहिष्कार कायम असल्याची भूमिका मनपातील कंत्राटदार असोसिएशनने घेतल्यामुळे मनपात निविदा सादर होण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

ठळक मुद्देसुवर्ण जयंती नगरोत्थान योजना, दलितेतर योजनेंतर्गत शहरात नऊ कोटी रुपयांतून विकास कामे केली जातील.मनपा प्रशासनाने नऊ कोटींच्या निविदा प्रकाशित केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने लागू केलेल्या ‘सीएसआर’ (शासकीय दर)चा मुद्दा उपस्थित झाला. निविदा अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २२ व २३ फेब्रुवारी असून, कोण-कोण अर्ज सादर करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अकोला : सुवर्ण जयंती नगरोत्थान व दलितेतर निधी अंतर्गत अकोला शहरात होणाऱ्या नऊ कोटींच्या विकास कामांसाठी मनपा प्रशासनाने फेरनिविदा जारी केली आहे. प्रशासनाने तांत्रिक मुद्दे निकाली काढावे; अन्यथा बहिष्कार कायम असल्याची भूमिका मनपातील कंत्राटदार असोसिएशनने घेतल्यामुळे मनपात निविदा सादर होण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे या प्रकरणी सत्ताधारी पक्ष काय तोडगा काढतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सद्यस्थितीत शहरातील प्रमुख सिमेंट रस्ते, दुभाजकांसह एलईडी पथदिव्यांची कामे होत असतानाच प्रभागातील अंतर्गत विकास कामांना खिळ बसल्याची भावना नगरसेवकांमध्ये निर्माण झाली आहे. २०१७-१८ करिता मंजूर झालेल्या सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना, दलितेतर योजनेंतर्गत शहरात नऊ कोटी रुपयांतून विकास कामे केली जातील. मनपा प्रशासनाने नऊ कोटींच्या निविदा प्रकाशित केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने लागू केलेल्या ‘सीएसआर’ (शासकीय दर)चा मुद्दा उपस्थित झाला. जीएसटी लागू झाल्यानंतर ‘सीएसआर’च्या दरांत वाढ होण्याची कंत्राटदारांना अपेक्षा होती. याठिकाणी शासकीय दर कमी झाले आहेत. तसेच प्रभागातील अंतर्गत सिमेंट रस्त्यांसाठी रेडी मिक्स प्लान्टची अट अडचणीची असल्याचा मुद्दा कंत्राटदार असोसिएशनने उपस्थित केला आहे. मागील अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे सुरक्षा ठेव रक्कम जमा असून, ती अदा करण्यास प्रशासन निरूत्साही असल्याचे नमूद करीत कंत्राटदार असोसिएशनने नऊ कोटींच्या विकास कामांवर बहिष्कार घातला आहे. या प्रकरणी मध्यंतरी महापौर विजय अग्रवाल यांनी मनपाच्या सभागृहात कंत्राटदारांच्या बैठकीचे आयोजन करून मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या उपस्थितीत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. यादरम्यान, प्रशासनाने मुदतीच्या आत विकास कामे निकाली न काढणाºया कंत्राटदारांना प्रति दिवस एक हजार रुपये दंड आकारण्याचे संकेत दिले होते. त्यासाठी बांधकाम विभागाने नोटीससुद्धा तयार केल्या. तसेच नऊ कोटींच्या फेरनिविदा प्रकाशित केल्या. निविदा अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २२ व २३ फेब्रुवारी असून, कोण-कोण अर्ज सादर करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.‘ईईएसएल’मुळे डोकेदुखीकेंद्र शासनाने मंजुरी दिलेल्या ‘ईईएसएल’ कं पनीलाच एलईडी पथदिव्यांची कामे देण्याचे राज्य शासनाचे राज्यातील आठ महापालिकांना निर्देश आहेत. यामुळे प्रशासन व नगरसेवकांनी तयार केलेल्या विकास कामांच्या प्रस्तावांत एलईडीचे प्रस्ताव बदलण्याची सर्वांवरच वेळ आली आहे. ईईएसएलच्या नियुक्तीमुळे प्रशासनासह नगरसेवकांची डोकेदुखी वाढल्याचे चित्र आहे.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका