अकोला एमआयडीसी भागात दीड लाखांची चोरी
By Admin | Updated: May 17, 2014 00:43 IST2014-05-17T00:43:17+5:302014-05-17T00:43:34+5:30
नवल ट्रान्सपोर्ट येथे दीड लाख रुपयांच्या साहित्याची चोरी झाल्याप्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांनी शुक्रवारी दुपारी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

अकोला एमआयडीसी भागात दीड लाखांची चोरी
एमआयडीसी भागात दीड लाखांची चोरी अकोला: एमआयडीसी भागातील नवल ट्रान्सपोर्ट येथे दीड लाख रुपयांच्या साहित्याची चोरी झाल्याप्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांनी शुक्रवारी दुपारी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. नवलकुमार अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, एमआयडीसीमधील सिटी स्पोर्ट क्लबजवळ मोकळ्या जागेतील टीनशेडमध्ये त्यांचे नवल ट्रान्सपोर्ट आहे. गुरुवारी मध्यरात्रीदरम्यान अज्ञात चोरट्यांनी टीनशेडमध्ये ठेवलेले टायर डिक्स, क्लच फ्लेट, टायर आदी साहित्य लंपास केले.