अकोला महापौर पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित

By Admin | Updated: August 17, 2014 00:14 IST2014-08-16T23:09:41+5:302014-08-17T00:14:04+5:30

महापौर पदाची सोडत शनिवारी दुपारी मंत्रालयातील परिषद सभागृहात झाली.

Akola Mayor's post reserved for general women category | अकोला महापौर पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित

अकोला महापौर पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित

अकोला : आगामी अडीच वर्षांच्या कालावधीसाठी महापौर पदाचे आरक्षण शनिवारी दूपारी मंत्रालयातील परिषद सभागृहात झालेल्या सोडतीनंतर जाहीर करण्यात आले. यात अकोल्याचे महापौर पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे.
राज्याचे नगर विकास राज्यमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील परिषद सभागृहात राज्यभरातील २६ महापालिकेतील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत १६ ऑगस्ट रोजी काढण्यात आली. यामध्ये अकोला मनपाचा समावेश आहे. अकोल्याचे महापौर पद आगामी अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गातील सदस्यासाठी आरक्षित झाले आहे. यापूर्वी मार्च २0१२ मध्ये अनुसूचित जाती (एससी प्रवर्ग) प्रवर्गातील महिला उमेदवाराचे आरक्षण निघाले होते. त्यावेळी मनपाच्या महापौरपदावर भारिप-बहूजन महासंघाच्या ज्योत्स्ना गवई विराजमान झाल्या होत्या. आता नव्या आरक्षणामुळे अकोला महापालिकेत पुन्हा महिला राज येणार हे स्पष्ट झाले आहे. येत्या ९ सप्टेंबर रोजी महापौरपदाचा कालावधी संपुष्टात येत आहे. आरक्षण सोडतीसाठी मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांची उपस्थितीती होती.

Web Title: Akola Mayor's post reserved for general women category

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.