अकोला महापौर पदासाठी काँग्रेसला पाठिंबा नाही!

By Admin | Updated: September 8, 2014 00:08 IST2014-09-08T00:08:26+5:302014-09-08T00:08:26+5:30

भारिप-बमसंची भूमिका जाहीर.

Akola Mayor does not support Congress for the post! | अकोला महापौर पदासाठी काँग्रेसला पाठिंबा नाही!

अकोला महापौर पदासाठी काँग्रेसला पाठिंबा नाही!

अकोला : महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला कदापि पाठींबा देणार नसल्याची भूमिका भारिप-बहुजन महासंघाने शुक्रवारी जाहीर केल्याने राजकीय पटलावर भूकंप आला आहे. भारिप-बमसंच्या सर्व नगरसेवकांनी एकमताने हा निर्णय घेतल्याची माहि ती भारिपचे गटनेता गजानन गवई यांनी स्पष्ट केले. भारिपच्या धक्कातंत्रामुळे काँग्रेसचे महापौर पदाचे स्वप्न तूर्तास धुळीस मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीला अवघ्या चार दिवसांचा अवधी शिल्लक असताना, भारिप-बमसंने राजकीय वतरुळात बॉम्बगोळा फेकला. महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेसला सहकार्य करायचे किंवा नाही, या मुद्यावर भारिप-बमसंच्या आठ नगरसेवकांची बैठक महा पौर ज्योत्स्ना गवई यांच्या दालनात ५ सप्टेंबर रोजी पार पडली. यामध्ये काँग्रेस आघाडीने अडीच वर्षांच्या कालावधीत भारिप-बमसंला कधीही सहकार्य केले नसल्याने विकासाचे अनेक मुद्दे प्रलंबित असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आल्याची माहिती आहे. सभागृहात शहर हिताचे निर्णय घेताना खुद्द सत्तापक्ष काँग्रेसनेच विरोध केल्याने विरोधकांचे आपोआपच फावले. खापर मात्र भारिपच्या नगरसेवकांवर फोडण्यात आले. परिणामी नागरिकांचा रोष भारिपच्या नगरसेवकांना सहन करावा लागला. अशास्थितीत महापौर पदासाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला पाठींबा देणे शक्य नसल्यावर एकमत करण्यात आले. पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी एकमताने घेतलेला निर्णय भारिपचे गटनेता गजानन गवई यांनी जाहीर केल्याने काँग्रेसच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. भारिपच्या भूमिकेमुळे राजकीय समीकरणांमध्ये मोठय़ा प्रमाणावर उलटफेर होण्याचे संकेत आहेत. यादरम्यान, काँग्रेसमधील काही इच्छूक उमेदवारांनी भारिपची मनधरणी सुरू केल्याची माहिती आहे.

** लोकसभा निवडणुकीचा असंतोष उफाळला
भारिप-बमसंचे अध्यक्ष अँड.प्रकाश आंबेडकर यांना लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्याक समाजाची मते मिळतील, अशी अपेक्षा होती. त्यानुषंगाने काँग्रेसमधील एका नेत्याने अँड.आंबेडकरांना आश्‍वासनदेखील दिले होते. लोकसभेचा निकाल जाहीर होताच मतांचे गणित स्पष्ट झाले. शिवाय अडीच वर्षांच्या कालावधीत भारिपच्या महापौरांना हाताशी धरून घडविण्यात आलेल्या राजकारणामुळे पक्षाचे प्रचंड नुकसान झाल्याचा पक्षश्रेष्ठींचा समज आहे. त्यामुळे अकोला पश्‍चिम मतदारसंघात अल्पसंख्याक समाजाच्या मतांवर डोळा ठेवून महापौर पदाची खेळी करणार्‍या उमेदवारांना धडा शिकवण्यासाठी काँग्रेसला मदत न करण्याची भूमिका पक्षाने घेतल्याची माहिती आहे.

Web Title: Akola Mayor does not support Congress for the post!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.