अकोला: दारूच्या नशेत अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून ५२ वर्षीय इसमाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजतापूर्वी सावंतवाडीतील संगम अपार्टमेंटमध्ये घडली. या प्रकरणात सिव्हिल लाईन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.शास्त्री नगरात राहणाऱ्या शिवाणी विशाल राऊत(२८ ) हिने दिलेल्या तक्रारीनुसार तिचे आईवडील संगम अपार्टमेंट येथे राहतात. भाऊ पुण्याला राहतो. तिचे वडील प्रमोद रामराव घाडगे हे दारू पिऊन तिसऱ्या मजल्यावरील त्यांच्या घरातील बाल्कनीत उभे राहून आरडाओरड करीत असल्याचे तिला आईने फोन करून सांगितले. त्यामुळे शिवाणी व तिचे पती वडीलांची समजूत घालण्यासाठी घरी गेले आणि मद्यधुंद अवस्थेतील प्रमोद घाडगे यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी काहीही न ऐकता थेट तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणात सिव्हिल लाईन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास पीएसआय नितीन बलीगवार करीत आहेत.
अकोला: तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून इसमाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 17:33 IST
अकोला: दारूच्या नशेत अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून ५२ वर्षीय इसमाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजतापूर्वी सावंतवाडीतील संगम अपार्टमेंटमध्ये घडली. या प्रकरणात सिव्हिल लाईन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.शास्त्री नगरात राहणाऱ्या शिवाणी विशाल राऊत(२८ ) हिने दिलेल्या तक्रारीनुसार तिचे आईवडील संगम अपार्टमेंट येथे राहतात. भाऊ पुण्याला राहतो. तिचे वडील ...
अकोला: तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून इसमाची आत्महत्या
ठळक मुद्देप्रमोद रामराव घाडगे हे दारू पिऊन तिसऱ्या मजल्यावरील त्यांच्या घरातील बाल्कनीत उभे राहून आरडाओरड करीत होते.त्यांनी काहीही न ऐकता थेट तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून उडी मारून आत्महत्या केली.या प्रकरणात सिव्हिल लाईन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.