शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

गव्हाणकर यांच्यासह दोन अपक्षांची माघार; अकोला मतदारसंघात १५ उमेदवार रिंगणात

By संतोष येलकर | Updated: April 8, 2024 20:13 IST

लोकसभा निवडणूक: लढतीचे चित्र स्पष्ट; प्रचाराची धामधूम सुरु

अकोला: लोकसभा निवडणुकीत अकोला मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत सोमवार ८ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत भाजपचे नारायणराव गव्हाणकर यांच्यासह दोन अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने, १५ उमेदवार रिंगणात उतरले असून लढतीचे चित्र स्पष्ट झाले. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसह समर्थक कार्यकर्त्यांकडून मतदारसंघात प्रचारकार्याची धामधूमही सुरु झाली आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या २६ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननी प्रक्रियेत ५ एप्रिल रोजी पूर्ण करण्यात आली. त्यामध्ये ११ उमेदवारांचे अर्ज नामंजूर करण्यात आले होते आणि १७ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज मंजूर करण्यात आले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ८ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत होती. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे नारायणराव गव्हाणकर आणि अपक्ष गजानन दोड या दोन अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे अकोला लोकसभा मतदारसंघात १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे चित्र स्पष्ट झाले.

निवडणूक रिंगणातील असे आहेत १५ उमेदवार रिगणातील उमेदवारांमध्ये अनुप धोत्रे (भारतीय जनता पार्टी),ॲड. प्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी), मुरलीधर पवार (अपक्ष), मो. एजाज मो. ताहेर (अपक्ष), धर्मेंद्र कोठारी (अपक्ष), अशोक थोरात (अपक्ष), रत्नदीप गणोजे (अपक्ष), डाॅ. अभय पाटील(भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस), काशीनाथ धामोडे (बहुजन समाज पार्टी), शेख नजीब शेख हबीब (इंडियन नॅशनल लीग), प्रीती सदाशिव (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सोशल), बबन सयाम (जनसेवा गोंडवाना पार्टी), रविकांत अढाऊ (जय विदर्भ पार्टी), दिलीप म्हैसने (अपक्ष), ॲड. उज्ज्वला राऊत (प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी) यांचा समावेश आहे.

उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप !निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक चिन्हा वाटपाची प्रक्रिया सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात पूर्ण करण्यात आली. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार, निवडणूक निरीक्षक रामप्रतापसिंग जाडोन यांच्यासह उमेदवारांचे निवडणूक प्रतिनिधी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

प्रचाराची धामधूम सुरु !चिन्हांचे वाटप झाल्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसह, कार्यकर्त्यांकडून मतदारसंघात निवडणूक प्रचार कार्याची धामधूम सुरु झाल्याचे चित्र आहे.

टॅग्स :akola-pcअकोलाBJPभाजपाcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४