शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

Akola Lok Sabha Results 2024 : अकाेल्यात भाजपाने गड राखला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 19:24 IST

Akola Lok Sabha Results 2024 : अनुप धाेत्रेंनी राखली वडिलांच्या विजयाची परंपरा कायम; डाॅ. अभय पाटील दुसऱ्या,ॲड. आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर

राजरत्न सिरसाट लाेकमत न्यूज नेटवर्कAkola Lok Sabha Results 2024 : अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार अनुप धाेत्रे यांनी त्यांच्या वडिलांच्या विजयाची मालिका कायम ठेवत विजयश्री खेचून आणला. अंत्यत चुरशिच्या झालेल्या या लढतीत धाेत्रे यांनी काँग्रेसचे उमेदवार डाॅ. अभय पाटील यांचा ४०,६२६ मतांनी पराभव केला. डाॅ़ अभय पाटील यांनी तगडी लढत दिली. अॅड प्रकाश आंबेडकरांच्या साेशल इंजिनिअरींगचा करिष्मा यावेळीही चालला नसल्याने त्यांना या निवडणुकीत तिसऱ्या क्रमाकांची मते मिळाली.

या मतदारसंघात १९८९, १९९१ आणि १९९६ मध्ये भाजपचे स्व. पांडुरंग फुंडकर सतत तीनदा विजयी झाले होते. तो विक्रम मोडीत काढत संजय धोत्रे यांनी २०१९ च्या निवडणुकीत चाैथ्यांदा निवडून येत नव्या विक्रमाची नोंद केली हाेती. तीच परंपरा त्यांचे चिरंजीव अनुप धाेत्रे यांनी राखली आहे. संजय धाेत्रे यांनी पक्ष बांधणीवर भर देऊन जिल्ह्यात भाजपची ताकद निर्माण केली. ते सलग चार वेळा खासदार हाेते, पाचव्यांदा त्यांचे चिरंजीव अनुप धाेत्रे विजयी झाल्याने अकाेला मतदारसंघ धाेत्रेंचाच असल्याचे पुन्हा अधाेरेखित झाले आहे. निवडणूक प्रचारादरम्यान, संजय धाेत्रे यांच्यानंतर पाचव्यांदा पुन्हा त्यांच्याच चिरंजीवाला उमेदवारी दिल्याने नकारात्मक लाट आहे, असे वातावरण निर्माण करण्यात आले होते, तथापि विरोधकांच्या या सर्व प्रकारच्या प्रचारावर मात करीत अनुप धोत्रे यांनी विजय मिळविला.

अकोला लोकसभा मतदारसंघात १८ लाख ९० हजार ८१४ मतदार असून, त्यापैकी ११ लाख ६८ हजार ३६६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. २०१९ च्या तुलनेत यावेळी पार पडलेल्या निवडणुकीत मतदानात १.७३ टक्क्यांनी वाढ झाली होती. यामध्ये -------- नवीन मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या मतदारांना आकर्षित करण्यात विरोधक अपयशी ठरले. धोत्रे यांनी ४,५७,३० इतकी मते मिळवली, काॅंग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांना ४,१६,४०४ अशी घवघवीत मते मिळाली. यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना २,७६,७४७ इतकी मते मिळाली.

वंचित बहुजन आघाडीचे काँग्रेसच्या महाविकास आघाडीसाेबत समीकरण जुळले नसल्याने काँग्रेसने ठरल्याप्रमाणे डाॅ. अभय पाटील यांना रिंगणात उतरविले. ॲड. आंबेडकर यांनी साेशल इंजिनिअरिंगचा प्रयाेग करीत आपले मताधिक्य वाढविण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला; परंतु आंबेडकरांनी यावेळी मांडलेली वेगळी चूल पुराेगामी विचारांच्या मतदारांना रुचली नसल्याने या निकालावरून अधाेरेखित हाेत आहे. मुस्लीम मतदारांनी यावेळी काँग्रेसच्या पारड्यात झाडून मतदान टाकले. काँग्रेसने सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या महागाई, बेराेजगारी मुद्दा प्रखरतेने लावून धरला. असे असले तरी भाजप सत्तेत आल्यास भारतीय राज्यघटना बदलणार यावर रान उठवले हाेते. यामुळे आंबेडकरी, बहुजन समाजाने ॲड. आंबेडकरांऐवजी यावेळी काँग्रेसला साथ दिल्याचे या निकालावरून स्पष्ट हाेत आहे.

डाॅ. पाटील यांनी दिली कडवी झुंजकाॅंग्रेसचे उमेदवार डाॅ. अभय पाटील १५ फेरीपर्यंत आघाडीवर हाेते. त्यानंतरच्या फेरीनंतर त्यांच्या आघाडीत घट हाेत भाजपचे उमेदवार अनुप धाेत्रे यांनी आघाडी घेतली, ती शेवटच्या २८ व्या फेरीपर्यंत कायम हाेती. परंतु डाॅ. अभय पाटील निवडणुकीत नवखे असताना त्यांनी कडवी झुंज दिली.

ॲड. आंबेडकरांची मते घटली२०१९ च्या लाेकसभा निवडणुकीत ॲड. प्रकाश आंबेडकर यांना २,७८,८४८ मते मिळाली हाेती. या निवडणुकीत त्यांच्या मतांचा टक्का २,१०१ मतांनी घटला आहे.

संजय धाेत्रे २,७४,६५७ मतांनी घेतली हाेती आघाडी२०१९ च्या लाेकसभा निवडणुकीत संजय धाेत्रे यांना ५,५४,४४४ मते मिळाली हाेती. त्यांचे प्रतिस्पर्धी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यापेक्षा २ लाख ७४ हजार ६५७ मतांची आघाडी घेत विजय मिळविला आहे.अनुप धाेत्रे यांना मात्र निवडूण येण्यासाठी संघर्ष करावा लागला़

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४AkolaअकोलाMaharashtraमहाराष्ट्र