शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019:  संजय धोत्रेंचा विजय निश्चित; आंबेडकर दुसऱ्या, तर पटेल तिसऱ्या स्थानावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 8:30 PM

अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार तथा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजय धोत्रे यांची घोडदौड सुरुच असून, त्यांचा ...

ठळक मुद्दे संजय धोत्रे यांना ५ लाख ४८ हजार ९५७ मतं मिळाली आहेत.वंचित बहूजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडर यांच्या पारड्यात २ लाख ७२ हजार ७७६ मतं पडली आहेत. काँग्रेसचे हिदायत पटेल यांना २ लाख ५२ हजार ५२७ मत मिळाली आहेत.

अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार तथा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजय धोत्रे यांची घोडदौड सुरुच असून, त्यांचा विजय निश्चित झाला आहे. अधिकृत घोषणा झाली नसली, तरी त्यांनी आतापर्यंत ५ लाख ४८ हजार ९५७ मते मिळविली असून, त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार त्यांच्या जवळपासही नसल्याने संजय धोत्रे हेच पुन्हा अकोल्याचे खासदार असतील.संजय धोत्रे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर २ लाख ७२ हजार २८१ मतांची मोठी आघाडी घेतली आहे. संजय धोत्रे यांना ५ लाख ४८ हजार ९५७ मतं मिळाली असून , वंचित बहूजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडर यांच्या पारड्यात २ लाख ७२ हजार ७७६ मतं पडली आहेत. काँग्रेसचे हिदायत पटेल यांना २ लाख ५२ हजार ५२७ मत मिळाली आहेत. अजुनही मतमोजणी सुरु आहे. संजय धोत्रे यांनी स्वत: चा विक्रम मोडीत काढीत पाच लाखांपेक्षा अधिक मतं मिळविली आहेत. गेल्या निवडणुकीत संजय धोत्रे यांनी ४ लाख ५६ हजार ४७२ मतांसह विजय साकारला होता, तर काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांना २ लाख ५३ हजार ३५६ मते मिळाली होती.भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपाचे संजय धोत्रे, काँग्रेसचे हिदायत पटेल, वंचित बहूजन आघाडीचे अ‍ॅॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यात तिरंगी लढत होत आहे. १९८४ पर्यंत काँग्रेसचा गड असलेल्या या मतदारसंघात भाजपाने १९८९ मध्ये विजय मिळविल्यावर काँग्रेसला उतरती कळा लागली. १९९८ व १९९९ या दोन निवडणुकीत काँग्रेसने अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आघाडीकेल्यामुळे त्याना यश मिळाले. मात्र आंबेडकरांनी काँग्रेसची साथ सोडताच काँर्ग्रेसला व अ‍ॅॅड.आंबेडकरांनाही विजय मिळाला नाही. २०१४ च्या निवडणुकीत रिंगणात असलेलेच उमेदवार २०१९ मध्ये पुन्हा एकदा समोर आल्याने निकालाची पुनरावृत्ती होते की वंचित किंवा काँग्रेस चमत्कार करते याबद्दल उत्सुकता आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात एकूण १८ लाख ६१ हजार ७३९ मतदार असून यंदाच्या निवडणुकीत ५९.९८ टक्के टक्के मतदान झालंय.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालakola-pcअकोलाSanjay Dhotreसंजय धोत्रेBJPभाजपाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर