शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
3
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
4
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
5
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
6
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
7
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
8
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
9
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
10
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
11
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
12
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
13
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
14
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
15
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

अकोला: रेल्वे स्टेशन, बसस्टँडवर ‘लॉकडाऊन’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 5:57 PM

रेल्वे स्टेशन, बसस्टँड परिसरात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.

अकोला: रविवारी सकाळपासूनच रेल्वे स्टेशन, बसस्टँड परिसरात पूर्णत: ‘लॉकडाऊन’ असल्याचे दिसून आले. रेल्वेच्या सकाळच्या गाड्यांमधून मोजकेच प्रवासी स्टेशनवर उतरले. रेल्वे स्टेशन, बसस्टँड परिसरात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने सकाळपासून तिकीट आरक्षण व तिकीट विक्री बंद केली. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर व फलाटांवर एकही प्रवासी दिसून आला नाही. सकाळी व दुपारी आलेल्या दोन रेल्वेगाड्यांनी कोलकोता, ओडिसा येथून आलेले सात-आठ प्रवासी हिंगोली, नांदेड आणि वाशिमला जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवरील प्रतीक्षालयात थांबले होते. बसस्टँडवरसुद्धा एकही प्रवासी दिसून आला नाही. अकोला आगारातील सर्व बसगाड्या लगतच्या वॅर्कशॉपमध्ये जमा करण्यात आल्या होत्या. प्रवासीच नसल्यामुळे बाहेरगावी बसगाड्या सोडण्यात आल्या नाहीत. एकंदरीतच रेल्वे स्टेशन आणि बसस्टँड परिसरात शुकशुकाट दिसून आला.प्रवासी अडकले, सायंकाळच्या रेल्वेने परतले!रेल्वे स्टेशनवरील दोन फलाटांवर कोलकोता, ओडिसा आणि पुणे येथून आलेले दहा ते बारा प्रवासी थांबलेले होते. बससेवा बंद असल्यामुळे त्यांना रेल्वे स्टेशनवरच थांबावे लागले. सायंकाळी रेल्वेगाडी असल्याने हे प्रवासी रेल्वेगाडीने वाशिम, हिंगोली, नांदेड व वर्धा येथे परतले.रेल्वे स्टेशनवर रेस्टॉरंट, हॉटेल सुरूबाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांना ‘जनता कर्फ्यू’चा फटका बसू नये किंवा त्यांना असुविधा होऊ नये, यासाठी रेल्वे स्टेशनवरील रेस्टॉरंट, हॉटेल सुरू होते. त्यामुळे बाहेरगावच्या प्रवाशांना दिलासा मिळाला. रेल्वे स्टेशनच्या बाहेरील परिसरातील हॉटेल, भोजनालय, रेस्टॉरंट मात्र बंद ठेवण्यात आले होते.रेल्वे स्टेशनवर ४८0 प्रवाशांची तपासणीरेल्वेगाडीने अकोल्यात येणाºया प्रवाशांची आरोग्य विभागामार्फत रविवारी तपासणी करण्यात येत होती. या ठिकाणी डॉक्टरांचे एक पथक आणि रुग्णवाहिका तैनात करण्यात आले होते. दुपारी ४ वाजतापर्यंत ४८0 प्रवाशांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान एकही प्रवासी कोरोना संशयित आढळून आला नाही.

एसटीची चाके थांबली!बसस्टँडवर एकही प्रवासी न फिरकल्यामुळे रविवारी सकाळपासूनच एसटी महामंडळाने एकही बसगाडी जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर सोडली नाही. तीन दिवस ‘लॉकडाऊन’ असल्यामुळे बसगाड्या सोडण्यात येणार नाही. अत्यावश्यक सेवा असेल तर बसगाड्या सोडण्यात येतील, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी स्मिता सुतवने यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAkola Railway Stationअकोला रेल्वे स्थानक