शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

अकोला : महापालिकेच्या प्रस्तावित इमारतीच्या जागेची मोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 2:44 AM

अकोला : महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानासमोरील जि.प. उर्दू शाळेची जागा निश्‍चित करण्यात आली आहे. शुक्रवारी या जागेची महापालिका व महसूल विभागाने मोजणी केली. त्यासोबतच जनता भाजी बाजार, जुने बसस्थानकाची जागा, बाजोरिया क्र ीडांगण व डम्पिंग ग्राउंडसाठी भोड येथील जागेचीही मोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. 

ठळक मुद्देजनता भाजी बाजार, जुने बसस्थानक जागेचीही मोजणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानासमोरील जि.प. उर्दू शाळेची जागा निश्‍चित करण्यात आली आहे. शुक्रवारी या जागेची महापालिका व महसूल विभागाने मोजणी केली. त्यासोबतच जनता भाजी बाजार, जुने बसस्थानकाची जागा, बाजोरिया क्र ीडांगण व डम्पिंग ग्राउंडसाठी भोड येथील जागेचीही मोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानासमोरील जि.प. उर्दू शाळेच्या जागेवर महापालिकेची प्रशासकीय इमारत उभारली जाणार आहे. यासंदर्भात मनपाच्या सर्वसाधारण सभेने मंजूर केलेला ठराव मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी शासनाकडे सादर करून त्याला मंजुरी मिळवली होती. प्रशासकीय इमारतीसाठी १0 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. शासनाने निधी मंजूर केल्यानंतर महसूल विभागाच्या अखत्यारित असणारी सदर जागा मनपाकडे हस्तांतरित होणे अद्यापि बाकी आहे. शहराची वाढलेली लोकसंख्या, वाहनांच्या संख्येत पडलेली भर पाहता प्रशासनाने अकोलेकरांसाठी पर्यायी सुविधा निर्माण करणे क्रमप्राप्त झाले आहे. त्यानुषंगाने शहरातील ज्या जागांवर आरक्षण आहे, सदर जागा ताब्यात घेण्यासाठी महापौर विजय अग्रवाल सक्रिय झाले आहेत. यामध्ये टॉवर चौकातील जुने बसस्थानकाच्या जागेवर कर्मशियल कॉम्प्लेक्स आणि वाहनतळाचे आरक्षण आहे. जनता भाजी बाजारच्या जागेवर कर्मशियल कॉम्प्लेक्सचे आरक्षण असून, बाजोरिया क्रीडांगणाच्या जागेवरही शासनाचे आरक्षण आहे. सदर जागांचा व्यावसायिकदृष्ट्या वापर करून त्याबदल्यात महसूल प्राप्त करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. 

भोड येथे डम्पिंग ग्राउंड?नायगावस्थित डम्पिंग ग्राउंडवर कचरा साठवणुकीसाठी जागाच शिल्लक नाही. कचर्‍यावर प्रक्रिया होत नसल्याने ग्राउंडवर कचर्‍याचे ढीग साचले आहेत. यावर पर्याय म्हणून शहरालगतच्या भोड ग्रामपंचायतच्या हद्दीत येणारी जागा प्रस्तावित करण्यात आली. यासंदर्भात मनपाने जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला असता त्याला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे भोड येथील जागेची सुद्धा मोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. 

शहराचा विस्तार वाढला असून, भविष्यातील पंधरा ते वीस वर्षांचे नियोजन ध्यानात घेऊन नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतील. त्यासाठी आतापासूनच पावले उचलली जात आहेत. उपरोक्त जागांचा व्यावसायिकदृष्ट्या वापर केला जाईल. त्यापासून मनपाला कायमस्वरूपी आर्थिक उत्पन्न मिळत राहील. -विजय अग्रवाल, महापौर 

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिका