शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

अकोला-खंडवा रेल्वे मार्गासह प्रलंबित प्रश्न निकाली काढणार! -   संजय धोत्रे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 12:37 IST

जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न निकाली काढणार असल्याची ग्वाही केंद्रीय मनुष्यबळ विकास, दूरसंचार तसेच इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिली.

ठळक मुद्देलोकमत अकोला कार्यालयात ना. धोत्रे यांनी शनिवारी भेट दिली.प्रारंभी लोकमत अकोला आवृत्तीचे निवासी संपादक रवी टाले यांनी ना. धोत्रे यांचा सत्कार केला.विविध प्रश्नांवर ना. धोत्रे यांनी विस्तृत उत्तरे देत विकासाचे संकल्पचित्र मांडले.

अकोला: अकोट-खंडवा-महुआच्या मीटरगेजचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर सुरू आहे. या कामामध्ये येणाऱ्या सर्व अडथळ्यांना पार करीत हे काम पूर्ण करण्यासोबतच जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न निकाली काढणार असल्याची ग्वाही केंद्रीय मनुष्यबळ विकास, दूरसंचार तसेच इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिली.लोकमत अकोला कार्यालयात ना. धोत्रे यांनी शनिवारी भेट दिली. यावेळी संपादकीय चमूसोबत त्यांनी संवाद साधला. प्रारंभी लोकमत अकोला आवृत्तीचे निवासी संपादक रवी टाले यांनी ना. धोत्रे यांचा सत्कार केला. जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर ना. धोत्रे यांनी विस्तृत उत्तरे देत विकासाचे संकल्पचित्र मांडले.अकोला-खंडवा रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर सुरू असून, या कामाच्या विरोधात पर्यावरणवाद्यांनी थेट न्यायालयात धाव घेतली असून, हा मार्ग बुलडाणा जिल्ह्यातून वळविण्याचीही मागणी होत आहे. या पृष्ठभूमीवर ना. धोत्रे यांना विचारणा केली असता, या मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामापैकी १८० किलोमीटरचे हैदराबाद-जयपूर रेल्वे लाइनचे काम पूर्ण झाले आहे. पर्यावरण व वन विभागाचे काही मुद्दे आहेत. त्याबाबत पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. हा मार्ग वेळेत पूर्ण करण्यााठी सर्वांनीच समन्वय ठेवत विकासाची दृष्टी ठेवली पाहिजे. कुठलाही मार्ग हा विकासाची रक्तवाहिनी असते, त्यामुळे अडथळ्यांवर मात करीत या मार्गासोबतच विकासाचाही मार्ग प्रशस्त केला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.देशाची जबाबदारी आली असल्यामुळे अकोल्याकडे दुर्लक्ष होणार नाही. येथील प्रश्नांची जाण व समस्यांचे भान असल्याने उपलब्ध मनुष्यबळाचे व्यवस्थापन उत्तम व्हावे, यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. कुठल्याही योजनेचे यशापयश हे अंमलबजावणीवर अवलंबून असते. त्यामुळे प्रशासनाला गतिमान करणे यावर भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.विदर्भाची कृषी पंढरी असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला कायमस्वरू पी पाणी पुरवठा नसल्याने संशोधनावर परिणाम होत आहे. उन्हाळ्यात तर प्रत्येक वर्षी येथील संशोधन हलविण्याची वेळ येते. त्यामुळे कृषी विद्यापीठाला कायमस्वरू पी पाणी पुरवठ्याची गरज आहे. यावर बोलताना येथेही व्यवस्थापनाची गरज असून, आहे ते पाण्याचे काटेकोर व्यवस्थापन करावे लागणार आहे. तद्वतच जुनी पाणी पुरवठा योजना सुरू करावी लागणार असल्याचे ना. धोत्रे यांंनी सांगितले. पूर्वी मोर्णा धरणातून विद्यापीठाला पाणी पुरवठा होत होता. तो पुन्हा सुरू करता येईल, असे ते म्हणाले.खारपाणपट्ट्यातील सिंचन प्रकल्पाचे काम अर्धवट आहे. ही कामे केव्हा पूर्ण होणार, या प्रश्नावर त्यांनी बहुप्रतीक्षित नेर-धामणा पूर्णा-२ बॅरेजचे काम जवळपास पूर्ण होत आले. यावर्षी बॅरेजमध्ये पाणी संकलन होणार आहे. कालव्याचे काम आधुनिक पद्धतीने केले जाणार आहे. इतरही निर्माणाधीन प्रकल्पांची कामे लवकरच मार्गी लागतील, त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे ना. धोत्रे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Sanjay Dhotreसंजय धोत्रेAkolaअकोलाAkola-Khandwa Gauge Conversionअकोला-खांडवा गेज रूपांतरणBSNLबीएसएनएल