लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा विभागीय मेळावा शुक्रवार, २६ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता आकाशवाणीसमोरील जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे व सचिव हनुमंतर ताटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. एसटी कामगारांच्या वेतनवाढीबाबात शासनाने अजूनही कोणतेच ठोस पाऊल उचलेले नाही. १६ जानेवारी रोजी मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीत कृती समितीने सादर केलेला वेतनवाढीचा प्रस्ताव शासनाने परत फेटाळून लावला. घोर निराशा झाल्याने कामगार संघटना पुन्हा संपाचे हत्यार उगारण्याच्या तयारित आहेत. याच पृष्ठभूमीवर २६ जानेवारी रोजी केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा व विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला असून, त्यात संघटनेचे केंद्रीय मंत्री संदीप शिंदे व हनुमंतराव ताटे हे विभागीय एसटी कमागारांना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमात गत ३५ वर्षांपासून संघटनेचे अकोला विभागाचे सचिवपद भूषविणारे अविनाश जहागीरदार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. मेळावा यशस्वी करण्यासाठी दीपक वैष्णव, कैलास नांदुरकर, देवानंद पाठक, विजय साबळे, जयवंत देशमुख, सुधीर महाजन, सचिन हाताळकर, उदय गंगाखेडकर, गणेश डांगे, अभिनव पांडे, दीपक महाले यांच्यासह विभागीय पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
अकोला : २६ जानेवारीला महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा विभागीय मेळावा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 22:31 IST
अकोला : महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा विभागीय मेळावा शुक्रवार, २६ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता आकाशवाणीसमोरील जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे व सचिव हनुमंतराव ताटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
अकोला : २६ जानेवारीला महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा विभागीय मेळावा!
ठळक मुद्देसंघटनेचे केंद्रीय मंत्री संदीप शिंदे व हनुमंतराव ताटे येणार