शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : आरोप-प्रत्यारोपांत ढसढसा रडले समाजकल्याण सहायक आयुक्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 01:38 IST

अकोला : समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयातील महिला कर्मचार्‍याच्या छळ प्रकरणात याच कार्यालयातील वरिष्ठ लिपिकास अटक करण्यात आल्याच्या मुद्यावर संबंधित महिला कर्मचारी आणि समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त अमोल यावलीकर यांच्यात झालेल्या आरोप-प्रत्यारोपांत सहायक आयुक्त यावलीकर ढसढसा रडल्याचा प्रकार शुक्रवारी पत्रकार परिषदेत घडला.

ठळक मुद्देमहिला कर्मचारी छळ प्रकरण : पत्रकार परिषदेत घडला प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयातील महिला कर्मचार्‍याच्या छळ प्रकरणात याच कार्यालयातील वरिष्ठ लिपिकास अटक करण्यात आल्याच्या मुद्यावर संबंधित महिला कर्मचारी आणि समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त अमोल यावलीकर यांच्यात झालेल्या आरोप-प्रत्यारोपांत सहायक आयुक्त यावलीकर ढसढसा रडल्याचा प्रकार शुक्रवारी पत्रकार परिषदेत घडला.गोंदिया जिल्हय़ातील अर्जुनी मोर येथे आयोजित अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाची माहिती देण्यासाठी समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयात  पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. सहायक आयुक्त अमोल यावलीकर यांनी संमेलनाची माहिती दिली. त्यानंतर समाजकल्याण सहायक आयुक्त कार्यालयातील महिला कर्मचार्‍याच्या छळ प्रकरणात याच कार्यालयातील वरिष्ठ लिपिक निरंजन खंडारे यांना गत ७ फेब्रुवारी सिटी कोतवाली पोलिसांनी अटक केली होती. या मुद्यावर सहायक आयुक्त यावलीकर यांना पत्रकार परिषदेत विचारणा करण्यात आली असता, यासंदर्भात संबंधित महिला कर्मचार्‍याकडून माझ्याकडे कोणतीही लेखी स्वरूपात तक्रार प्राप्त झाली नसल्याचे सांगत, सहायक आयुक्तांनी संबंधित महिला कर्मचार्‍यास पत्रकार परिषदेत बोलावले. वरिष्ठ लिपिकाकडून छळ होत असल्याची तक्रार मी सहायक आयुक्तांकडे  दिली आहे. माझ्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले असून, साहेब (सहायक आयुक्त) छळ करणार्‍या वरिष्ठ लिपिकास पाठीशी घालत आहेत, असा आरोप संबंधित महिला कर्मचार्‍याने यावेळी केला. माझ्याकडे लेखी तक्रार प्राप्त नसून, वरिष्ठ लिपिकास पाठीशी घालण्याचा प्रश्नच नाही. छळाच्या प्रकरणात संबंधित वरिष्ठ लिपिकाविरुद्ध पोलीस कारवाई करण्यात आली असून, पोलीस विभागाच्या अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सहायक आयुक्त यावलकीर यांनी यावेळी सांगितले. या मुद्यावर सहायक आयुक्त यावलीकर आणि संबंधित महिला कर्मचार्‍यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना, ‘तुम्ही माझ्या आईसारख्या आहात’, असे सहायक आयुक्तांनी म्हटल्यावर ‘तुमच्या आईचा छळ झाला असता, तर तुम्हाला काय वाटले असते’, असा प्रश्न संबंधित महिला कर्मचार्‍याने सहायक आयुक्तांना केला. ‘आई’चा उल्लेख करताच सहायक आयुक्त यावलीकर यांच्या डोळ्यांत अश्रू आले आणि ते ढसढसा रडू लागले. रडल्याने त्यांचे डोळेही लालबुंद झाले होते.

माझ्या ‘आई’ला बोलू नका!छळ प्रकरणात तक्रारकर्त्या महिला कर्मचार्‍याने ‘साहेब, ..तुमच्या आईचा छळ झाला असता तर.. असा उल्लेख करताच, ‘माझ्या आईला बोलू नका’, असे समाजकल्याण सहायक आयुक्त यावलीकर यांनी ठणकावून सांगितले.  माझ्या आईने खूप कष्ट केले.. मला घडविले. त्यामुळे माझ्या आईला बोलू नका, असे सांगत सहायक आयुक्त यावलीकर यांच्या डोळ्यांत अश्रू आले आणि ते ढसढसा रडले.

टॅग्स :Akola cityअकोला शहर