शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
3
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
4
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
5
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
6
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
7
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
8
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
9
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
10
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
11
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
12
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
13
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
14
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
15
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
16
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
17
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
18
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
19
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
20
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 

अकोला : राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचे आज उद्घाटन; स्पर्धेकरिता तीन रिंक सज्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 01:42 IST

अकोला : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या विद्यमाने आयोजित राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा - २0१७-१८ (१९ वर्षाआतील मुले-मुली) चे उद्घाटन शनिवार, २0 जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता जिल्हा क्रीडा संकुल, संगीतकार वसंत देसाई स्टेडिअम, अकोला येथे गृह राज्यमंत्री तथा  जिल्हय़ाचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

ठळक मुद्देखेळाडूंची वैद्यकीय व वजन गट तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या विद्यमाने आयोजित राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा - २0१७-१८ (१९ वर्षाआतील मुले-मुली) चे उद्घाटन शनिवार, २0 जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता जिल्हा क्रीडा संकुल, संगीतकार वसंत देसाई स्टेडिअम, अकोला येथे गृह राज्यमंत्री तथा  जिल्हय़ाचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते होणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार संजय धोत्रे राहतील. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, आमदार गोपीकिसन बाजोरिया, आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकाळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार बळीराम सिरस्कार, आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अमरावती विभाग क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख, बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव जय कोहली, आंतरराष्ट्रीय बॉक्सर कॅप्टन देवीचंद व विजेंद्र मल यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

खेळाडूंची निघणार रॅली२४ जानेवारीपर्यंत चालणार्‍या या स्पर्धेतील सहभागी शालेय खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, याकरिता शनिवारी स्पर्धा उद्घाटनापूर्वी दुपारी १ वाजता शासकीय अध्यापक महाविद्यालय येथून रॅली निघणार आहे. रॅली दुर्गा चौकातून मार्गक्रमण करीत स्पर्धास्थळी पोहोचणार आहे.

खेळाडूंची वैद्यकीय व वजन गट तपासणीदेशभरातून आलेल्या ४१८ खेळाडूंची शुक्रवार, १९ जानेवारी रोजी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच खेळाडूंचा निश्‍चित वजन गट ठरविण्याकरिता वजन घेण्यात आले. स्पर्धेत गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू व कश्मीर, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश, सीबीएसई, पंजाब, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तराखंड, विद्याभारती, चंदीगड, दिल्ली, डीएव्ही, बिहार, आयपीएससी, केंद्रीय विद्यालय संघटन, ओडिशा, उत्तर प्रदेश संघ सहभागी झाले आहेत. यामध्ये २४७ मुले व १७१ मुलींचा समावेश आहे.

विद्यार्थी बघतील लढतीया स्पर्धेतील लढती जिल्हय़ातील विद्यार्थ्यांना बघता याव्या, याकरिता जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत  मुख्याध्यापकांना सूचनापत्र पाठविले आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॉक्सरांचा खेळ पाहून जिल्हय़ामधून उत्तम बॉक्सर तयार व्हावे, हा उपक्रमामागील उद्देश आहे.

तीन रिंक सज्जया स्पर्धेनिमित्त  वसंत देसाई स्टेडिअम येथे आंतरराष्ट्रीय  दर्जाच्या तीन बॉक्सिंग रिंक तयार करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी या तिन्ही रिंकची चाचणी आयोजकांमार्फत घेण्यात येऊन, कोणतीही त्रुटी यामध्ये निघाली नाही.

टॅग्स :boxingबॉक्सिंगAkola cityअकोला शहरSchoolशाळा