शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अकोला, मानो-यात शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2017 08:04 IST

सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील दोन शेतक-यांनी आत्महत्या केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला/मानोरा: सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील दोन शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. अकोला जिल्ह्यातील डोंगरगाव येथील शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २४ जून रोजी सकाळी अकरा वाजता उघडकीस आली. वासुदेव रामकृष्ण थोटे असे मृतक शेतकर्‍याचे नाव आहे. मृतक वासुदेव थोटे यांच्याकडे सहा एकर शेती होती. त्यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ७0 ते ८0 हजार रुपयांचे कर्ज थकीत होते. अपेक्षित उत्पन्न न झाल्यामुळे त्यांच्यावरील कर्जाचा बोजा वाढतच होता. यावर्षीही दुबार पेरणीचे संकट असल्याने कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत त्यांनी शनिवारी शेतातील गोठय़ामध्ये गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथे पाठविला. थोटे यांच्या पश्‍चात दोन मुले, तीन मुली, पत्नी, जावई व नातवंडे असा आप्त परिवार आहे. याविषयी माहिती मिळताच आमदार रणधीर सावरकर यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन घटनेची सविस्तर माहिती घेऊन दु:ख व्यक्त केले. याप्रकरणी पुढील तपास बोरगावमंजू पोलीस करीत आहेत. दुसर्‍या घटनेत वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील मौजे जगदंबा नगर (हळदा) येथील अल्पभूधारक शेतकरी राजेश भगवान जाधव (वय ३५ वर्षे) यांनी वाढत्या कर्जाला कंटाळून शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. २३ जून रोजी यवतमाळ येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.मृतक शेतकरी जाधव यांच्या नावे जगदंबानगर शिवारात ४ एकर कोरडवाहू शेती आहे. त्यांच्यावर विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँकेच्या गिरोली शाखेचे ५0 हजार रुपये थकीत कर्ज आहे. यासह सावकारी कर्ज, नातलगांकडून घेतलेले उसने पैसे आदी कारणांमुळे ते सतत चिंतातुर राहायचे, असे मृतकाच्या पत्नीने सांगितले. २२ जून रोजी नित्यनेमाप्रमाणे शेतात गेल्यानंतर तेथेच जाधव यांनी कीटकनाशक प्राशन केले. ही बाब कुटुंबीयास कळताच त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचाराकरिता यवतमाळकडे रवानगी करण्यात आली; मात्र उपचारादरम्यान २३ जून रोजी मृत्यूशी झुंज देताना शेतकरी जाधव यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.