शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

अकोला: ‘भूमिगत’प्रकरणी हायकोर्टाची शासन, मजीप्राला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 1:24 PM

अकोला:हायकोर्टाने राज्य शासनासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, महापालिका तसेच संबंधित कंपनीला नोटीस जारी केली आहे.

ठळक मुद्दे‘सिवरेज ट्रिटमेंट प्लान्ट’चे बांधकाम शिलोडा येथील ६ एकर परिसरावर सुरू आहे.या कामात कंपनीने वापरलेले साहित्य निकषानुसार नसल्याचा तपासणी अहवाल अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने दिला. या मुद्यावर मनपातील शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी आक्षेप नोंदवत मनपा प्रशासनाकडे तक्रार केली, तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली.

- आशिष गावंडे

अकोला:शहरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या भूमिगत गटार योजनेतील ‘सिवरेज ट्रिटमेंट प्लान्ट’ (मलनिस्सारण प्रकल्प)च्या बांधकामात वापरल्या जाणारे साहित्य निकषानुसार नसल्याच्या अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने दिलेल्या तपासणी अहवालाच्या आधारे शिवसेनेने नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असता, याप्रकरणी मंगळवारी न्यायाधीश बी.पी. धर्माधिकारी, ए.डी. उपाध्याय यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी हायकोर्टाने राज्य शासनासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, महापालिका तसेच संबंधित कंपनीला नोटीस जारी केली आहे. यादरम्यान, मजीप्राचे कार्यकारी अभियंता विवेक सोळंके यांनी मनपा प्रशासनाकडे सादर केलेल्या अहवालात रेतीच्या मुद्यावर करारनाम्यात वर्धा नदीचा चुकीने उल्लेख झाला असल्याचे नमूद करीत बांधकाम साहित्याच्या विषयांवर इगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड कंपनीला क्लीन चिट दिल्याने या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या भुवया उंचावल्या आहेत.केंद्र व राज्य शासनाच्या ‘अमृत’ योजनेंतर्गत मनपा क्षेत्रातील सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी भूमिगत गटार योजना मंजूर करण्यात आली. महापालिका प्रशासनाने इगल इन्फ्रा इंडिया लिमीटेड कंपनी, ठाणे यांना १३ डिसेंबर २०१७ रोजी कामाची वर्कआॅर्डर दिली. पहिल्या टप्प्यात शासनाने मंजूर केलेली ६१ कोटींची योजना ८० कोटींच्या आसपास जाणार, हे निश्चित आहे. कंपनीला दोन वर्षांच्या कालावधीत योजनेचे काम पूर्ण करणे क्रमप्राप्त आहे. ‘भूमिगत’मधील सर्वात महत्त्वाचा घटक मानला जाणाºया ‘सिवरेज ट्रिटमेंट प्लान्ट’चे बांधकाम शिलोडा येथील ६ एकर परिसरावर सुरू आहे. या कामात कंपनीने वापरलेले साहित्य निकषानुसार नसल्याचा तपासणी अहवाल अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने देताच कंपनीसह तांत्रिक सल्लागार असणाºया महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. अभियांत्रिकी महाविद्यालयाने तपासणी अहवाल दिल्यानंतरही कंपनीच्या देयकातून दंडात्मक रक्कम कपात न करता मजीप्राने ७ कोटींच्या देयकाची फाइल मनपा प्रशासनाकडे सादर केली. या मुद्यावर मनपातील शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी आक्षेप नोंदवत मनपा प्रशासनाकडे तक्रार केली, तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. याप्रकरणी मंगळवारी न्यायाधीश बी.पी. धर्माधिकारी, ए.डी. उपाध्याय यांच्यासमोर सुनावणी झाली असता, न्यायालयाने याचिकाकर्त्याची बाजू ऐकून घेत नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव, मजीप्राचे कार्यकारी अभियंता, इगल इन्फ्रा कंपनी तसेच मनपा प्रशासनाला नोटीस जारी केली आहे.अखेर देयकावर शिक्कामोर्तबकंपनीच्या कामावर शिवसेनेने आक्षेप घेतल्यामुळे महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी मजीप्राने सादर केलेले ७ कोटींचे देयक अदा न करता याविषयी खुलासा सादर करण्याचे पत्र दिले होते. मजीप्राने कंपनीला क्लीन चिट दिल्याचा अहवाल प्राप्त होताच मंगळवारी मनपा प्रशासनाने ७ कोटींच्या देयकावर शिक्कामोर्तब केले. ‘एसटीपी’च्या ठिकाणी निर्माणाधीन २८ दिवसांच्या काँक्रिटीकरणाचा तपासणी अहवाल प्राप्त होईपर्यंत कंपनीला अदा केलेल्या ७ कोटींच्या देयकातून १५ टक्के रक्कम तूर्तास थांबविण्यात आली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाHigh Courtउच्च न्यायालय