शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पात अकोला : मोर्णा स्वच्छता मिशनला मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 18:51 IST

अकोला -जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि विविध स्वयंसेवी संस्था व संघटनांच्यावतीने १३ जानेवारीपासून राबविण्यात येत असलेल्या ‘मोर्णा नदी स्वच्छता मिशन’ला राज्याच्या अर्थसंकल्पात विशेष निधीची तरतूद झाल्याने आणखी भर पडली आहे.

ठळक मुद्देदर शनिवारी लोकसहभागातून ‘मोर्णा नदी स्वच्छता मिशन’ नदीपात्राच्या दोन्ही काठावर राबविण्यात येत आहे. मोर्णा नदीकाठाचा विकास आणि सौंदर्यीकरणाच्या कामाचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी तयार केला आहे.आता अर्थसंकल्पात निधीची घोषणा झाल्याने मोर्णा स्वच्छता अभियानाचा संकल्प प्रत्यक्षात येण्यास मोलाची मदत होणार आहे.

अकोला -जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि विविध स्वयंसेवी संस्था व संघटनांच्यावतीने १३ जानेवारीपासून राबविण्यात येत असलेल्या ‘मोर्णा नदी स्वच्छता मिशन’ला अकोलेकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्यानंतर अकोलकरांचा उत्साह वाढला. त्यामध्ये आता राज्याच्या अर्थसंकल्पात मोर्णेसाठी विशेष निधीची तरतूद झाल्याने आणखी भर पडली आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अकोला शहरातील मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेला मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत, राज्यातील जलस्रोतांच्या स्वच्छता व सौंदर्यीकरणाच्या योजनेसाठी २७ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केल्याच्या घोषणेने मोर्णा स्वच्छता मोहिमेला बळ मिळाले आहे.मोर्णा नदी अकोला शहराचे वैभव आहे; परंतु मोर्णा नदीपात्रात जलकुंभी मोठ्या प्रमाणात वाढली असून, घाण कचरा साचला आहे. शहरातील सांडपाणी नदीत जात असल्याने, मोर्णा नदीत अस्वच्छता पसरली आहे. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासन, महानगरपालिका व शहरातील विविध सेवाभावी संस्था, सामाजिक संघटना, कर्मचारी संघटना व मनपा अंतर्गत सफाई कर्मचाºयांसह लोकसहभागातून १३ जानेवारी रोजी मोर्णा नदी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली; त्यानंतर दर शनिवारी लोकसहभागातून ‘मोर्णा नदी स्वच्छता मिशन’ नदीपात्राच्या दोन्ही काठावर राबविण्यात येत आहे. तसेच मोर्णा नदीकाठाचा विकास आणि सौंदर्यीकरणाच्या कामाचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी तयार केला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने नदी पात्राच्या परिसरात शोष खड्डे तयार करणे, नदी काठावर घाट उभारणे, एलईडी पथदिवे लावणे, वृक्षारोपण आणि उद्यानांची निर्मिती करणे इत्यादी विकास कामांचा समावेश आहे. शासनाकडून निधी प्राप्त होण्याची वाट न बघता, अकोलेकरांच्या लोकसहभागातून दोन वर्षात मोर्णा नदीकाठी विविध विकास कामांसह सौंदर्यीकरणाची कामे करण्यात येणार आहेत.या सर्व कामांची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये घेतल्यावर मोहिमेला अधिक बळ मिळाले. त्यामध्ये आता अर्थसंकल्पात निधीची घोषणा झाल्याने मोर्णा स्वच्छता अभियानाचा संकल्प प्रत्यक्षात येण्यास मोलाची मदत होणार आहे.सकारात्मक काम हाती घेतले, तर पाठबळ मिळतेच हा संदेश मोर्णा मिशनच्या निमित्ताने समोर आला आहे. पंतप्रधानांनी दखल घेतल्यावर सर्वांचा उत्साह वाढला होता व नव्या जोमाने हे मिशन सुरू झाले व आता अर्थसंकल्पात मदतीची घोषणा झाल्याने मोर्णा मिशन पूर्णत्वास जाण्यास विलंंब लागणार नाही. हा अकोलेकरांच्या एकजुटीचा व सकारात्मक कार्याचा गौरव आहे.- आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हाधिकारी अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाMorna Swachata Missionमोरणा स्वछता मोहीमBudget 2018अर्थसंकल्प २०१८