अकोल्यात ७.0५ मि.मी.पावसाची नोंद
By Admin | Updated: July 31, 2014 02:09 IST2014-07-31T01:50:59+5:302014-07-31T02:09:03+5:30
जिल्हय़ात रिमझिम पाऊस

अकोल्यात ७.0५ मि.मी.पावसाची नोंद
अकोला : जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह बुधवारी सकाळपासून दिवसभर रिमझिम पाऊस झाला असून, रात्री ८.३0 वाजेपर्यंत अकोला शहरात ७.0५ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली.
गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात रिमझिम पाऊस हजेरी लावत आहे. दरम्यान गेल्या २२ व २३ जुलैे रोजी जिल्ह्यात संततधार पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला होता. बुधवार, ३0 जुलै रोजी सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह अधून-मधून दिवसभर रिमझिम पाऊस येत होता.
सायंकाळी ५.३0 ते ८.३0 वाजेपर्यंत दमदार पाऊस बरसला, अकोला शहरात रात्री ८.३0 वाजेपर्यंत ७.0५ मि.मी.पावसाची नोंद करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील हवामानशास्त्र विभाग कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत रिमझिम पाऊस सुरूच होता. रिमझिम पाऊस सुरू झाल्यानंतर, जिल्ह्यात खरीप पेरण्या आटोपण्याच्या मार्गावर असताना, सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा केली जात आहे.
* अतवृष्टीची शक्यता; दक्षता घेण्याचे निर्देश!
येत्या ४८ तासांत विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये अतवृष्टी होण्याची शक्यता नागपूर येथील हवामान वेधशाळेमार्फत वर्तविण्यात आली आहे. अतवृष्टी होण्याची शक्यता असल्याच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील संबंधित सर्वच विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी मुख्यालयी हजर राहून, योग्य ती दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी बुधवारी दिले. याबाबत जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि संबंधित अधिकारी व कर्मचार्यांना पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.