राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत अकोल्याला ४१ पदके
By Admin | Updated: October 6, 2014 01:32 IST2014-10-06T01:32:26+5:302014-10-06T01:32:26+5:30
चंद्रपूर येथील राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत अकोलाच्या खेळाडूंनी सवरेत्कृष्ट कामगीरी.

राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत अकोल्याला ४१ पदके
अकोला : चंद्रपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत अकोलाच्या खेळाडूंनी सवरेत्कृष्ट खेळप्रदर्शन करीत ४१ पदकांसह राज्यात प्रथम स्थान पटकाविले. यामध्ये १९ सुवर्णपदके, ४ रौप्य पदके व १८ कांस्यपदकांचा समावेश आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूरच्या वतीने स् पर्धेचे आयोजन केले होते.
अमरावती विभाग व अकोला क्रीडा प्रबोधिनीच्या ६५ खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. त्यापैकी ४१ खेळाडूंना पदकांची कमाई करता आली. अकोल्याचा हरिवंश टावरी याला १९ वर्षाआतील गटात बेस्ट बॉक्सरचा पुरस्कार मिळाला. रोहण पटेकर, नाना पिसाळ व जिब्रान खान यांना बेस्ट प्रोमोसिंग बॉक्सरचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरुष गटात क्रीडापीठ अकोला संघ राज्यात अव्वल स् थानी राहिली. सर्व बॉक्सर क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भट्ट, पुरुषोत्तम बावणे, डॉ. शाकीर पठाण, नीळकंठ देशमुख, राहुल वानखडे, संदीप सिंग यांच्या प्रशिक्षण घेत आहेत.