अकोला गारठले; ७.९ अंश
By Admin | Updated: January 23, 2016 02:12 IST2016-01-23T02:12:33+5:302016-01-23T02:12:33+5:30
अकोला जिल्ह्यावर शीतलहरींचा परिणाम

अकोला गारठले; ७.९ अंश
अकोला: शीतलहरींचा परिणाम अकोला जिल्ह्यावर निर्माण झाला असून, शुक्रवारी अकोल्याचे किमान तापमान ७.९ अंश सेल्सियसपर्यंत घसरले. यावर्षी हे तापमान दुसर्यांदा खाली आले आहे. यापूर्वी २६ डिसेंबरला अकोला शहराचे किमान तापमान ७.५ डिग्री सेल्सियसची नोंदवले गेले होते. दरम्यान, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने किमान तापमान ५ अंश सेल्सियस नोंदवले आहे. २१ जानेवरी रोजी शहराचे किमान तापमान १0.१ अंश सेल्सियस होते. १९ आणि २0 जानेवारीला हेच किमान तापमान १७.५, १0 जानेवरीला १३.२, ४ जानेवारीला १२.६ आणि ३ जानेवारीला १२.७ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली. २६ डिसेंबर रोजी किमान तापमान ७.५ अंशापर्यंत घसरले होते. २३ डिसेंबरला ११.७, २४ डिसेंबरला १0.९, तर २८ डिसेंबरला १0.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.