लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मालमत्तेशी संबंधित नमुना आठ अ मध्ये झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामसेविका दीपाली रामकृष्ण भोबळे (३0) हिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने गुरुवारी दुपारी उमरी नाक्यावरील पोलीस चौकीजवळ रंगेहात अटक केली. या प्रकरणात एसीबीने सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तक्रारकर्त्याने नमुना आठ अ तयार करून घेतले होते; परंतु त्यात चूक असल्याने ग्रामसेविका दीपाली भोबळेला चूक दुरुस्त करण्यासाठी विनंती केली. भोबळे ही चालढकल करीत होती. काही दिवसांपूर्वी तिने तक्रारकर्त्याकडे नमुना आठ अ मधील चूक दुरुस्त करण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी केली; परंतु तक्रारकर्त्याला लाच द्यायची नसल्याने, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर तक्रारकर्ता व ग्रामसेविका भोबळे यांच्यात दोन हजार रुपये देण्याची तडजोड झाल्यावर भोबळे हिने तक्रारकर्त्याला पैसे घेऊन उमरी नाक्यावरील पोलीस चौकीजवळ बोलाविले. या ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी सापळा रचला होता. ग्रामसेविका भोबळे हिने तक्रारकर्त्याकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तिला रंगेहात अटक केली. तिच्याकडून दोन हजार रुपये जप्त केले. ग्रामसेविका दीपाली भोबळे हिला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
अकोला : लाच स्वीकारताना ग्रामसेविकेस अटक; ‘एसीबी’ची कारवाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 23:59 IST
अकोला : मालमत्तेशी संबंधित नमुना आठ अ मध्ये झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामसेविका दीपाली रामकृष्ण भोबळे (३0) हिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने गुरुवारी दुपारी उमरी नाक्यावरील पोलीस चौकीजवळ रंगेहात अटक केली. या प्रकरणात एसीबीने सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
अकोला : लाच स्वीकारताना ग्रामसेविकेस अटक; ‘एसीबी’ची कारवाई!
ठळक मुद्देनमुना आठ अ मध्ये दुरुस्तीसाठी मागितली लाच