अकोला ‘जीएमसी’चे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांची गुणवंत शिक्षक म्हणून निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 16:12 IST2018-09-01T16:10:13+5:302018-09-01T16:12:22+5:30

अकोला: येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता तथा सूक्ष्म जीवशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. राजेश कार्यकर्ते यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील गुणवंत शिक्षक म्हणून निवड करण्यात आली.

Akola GMC's Dean Dr. Rajesh Karkarekar's selection as a quality teacher | अकोला ‘जीएमसी’चे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांची गुणवंत शिक्षक म्हणून निवड

अकोला ‘जीएमसी’चे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांची गुणवंत शिक्षक म्हणून निवड

ठळक मुद्देयेत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी त्यांच्यासह एकूण १४ गुणवंत शिक्षकांचा सत्कार मुंबईत करण्यात येणार आहे.गुणवंत शिक्षकांचा शिक्षकदिनी ५ सप्टेंबरला मुंबईत सत्कार करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण खात्याने घेतला आहे.

अकोला: येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता तथा सूक्ष्म जीवशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. राजेश कार्यकर्ते यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील गुणवंत शिक्षक म्हणून निवड करण्यात आली असून, येत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी त्यांच्यासह एकूण १४ गुणवंत शिक्षकांचा सत्कार मुंबईत करण्यात येणार आहे.
५ सप्टेंबर या शिक्षकदिनी मुंबईत गौरव करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांत सेवा देणाऱ्या विविध महाविद्यालयांतील १४ गुणवंत शिक्षकांची नावे नुकतीच जाहीर केली. त्यामध्ये अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता तथा सूक्ष्म जीवशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. राजेश कार्यकर्ते यांचाही समावेश आहे.
नागपूरच्या मेडिकल, मेयोसह राज्यात १७ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये आणि तीन शासकीय दंत महाविद्यालये व रुग्णालये वैद्यकीय शिक्षण खात्याच्या अखत्यारित येतात. येथे सेवा देणाºया गुणवंत शिक्षकांचा शिक्षकदिनी ५ सप्टेंबरला मुंबईत सत्कार करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण खात्याने घेतला आहे. निवड झालेल्या या शिक्षकांमध्ये डॉ. राजेश कार्यकर्ते (अकोला) यांच्यासह डॉ. प्रवीण जाधव (गोंदिया), डॉ. वैशाली शेलगांवकर (मेयो, नागपूर), डॉ. उदय नारलावार (मेडिकल, नागपूर), डॉ. सुभाष कुंभारे (शासकीय दंत महाविद्यालय), डॉ. शिरूरे (सोलापूर), डॉ. समीर जोशी (पुणे), डॉ. शिवाजी सुक्रे (औरंगाबाद), डॉ. गोरे (लातूर), डॉ. रागिनी पारेख ( मुंबई), डॉ. अरुणकुमार व्यास ( मुंबई), डॉ. ज्योती भावठाणकर ( मुंबई), डॉ. जे. व्ही. तुपकरी ( मुंबई), डॉ. बिराजदार (अंबेजोगाई) यांचा समावेश आहे.

Web Title: Akola GMC's Dean Dr. Rajesh Karkarekar's selection as a quality teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.