शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

अकोला जीएमसी : तक्रारकर्त्या प्राध्यापिकेचा आत्मदहनाचा इशारा मागे

By atul.jaiswal | Published: January 25, 2018 1:48 PM

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील जनवैद्यक औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अरुण हुमने हे मानसिक छळ करीत असल्याचा आरोप करीत पोलीस अधीक्षकांकडे दिलेल्या तक्रारीत आत्मदहनाचा इशारा देणाºया याच विभागातील सहयोगी प्राध्यापिका डॉ. कल्पना काळे (अस्वार) यांनी त्यांचा हा इशारा मागे घेतल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी बुधवारी ...

ठळक मुद्देजन औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अरुण हुमने हे आपल्याला व आपल्या पतीला मानसिक त्रास देत असल्याची लेखी तक्रार सहयोगी प्राध्यापिका डॉ. कल्पना काळे (अस्वार) यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी समिती गठित केली.अधिष्ठाता डॉ. कार्यकर्ते यांनी चौकशी समितीला एका महिन्यात चौकशी पूर्ण करण्याचा आदेश दिला. यानंतर डॉ. कल्पना काळे यांनी आपला आत्मदहनाचा इशारा मागे घेतला.

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील जनवैद्यक औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अरुण हुमने हे मानसिक छळ करीत असल्याचा आरोप करीत पोलीस अधीक्षकांकडे दिलेल्या तक्रारीत आत्मदहनाचा इशारा देणाºया याच विभागातील सहयोगी प्राध्यापिका डॉ. कल्पना काळे (अस्वार) यांनी त्यांचा हा इशारा मागे घेतल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी बुधवारी दिली.जन औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अरुण हुमने हे आपल्याला व आपल्या पतीला मानसिक त्रास देत असल्याची लेखी तक्रार सहयोगी प्राध्यापिका डॉ. कल्पना काळे (अस्वार) यांनी सोमवार, २२ जुलै रोजी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. तसेच वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांकडेही त्यांनी याबाबत तक्रार केल्याने या प्रकरणाने गंभीर वळण घेतले होते. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी पॅथॉलॉजी विभागप्रमुख डॉ. प्रदीप उमप, न्याय वैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. अनिल बत्रा आणि स्त्री व प्रसूती रोग विभाग प्रमुख डॉ. अपर्णा वाहने यांचा समावेश असलेली समिती गठित केली. सदर समितीची बैठक बुधवारी अधिष्ठाता यांच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीत डॉ. कल्पना काळे (अस्वार)व त्यांचे पती डॉ. अस्वार उपस्थित होते. अधिष्ठाता डॉ. कार्यकर्ते यांनी चौकशी समितीला एका महिन्यात चौकशी पूर्ण करण्याचा आदेश दिला. यानंतर डॉ. कल्पना काळे यांनी आपला आत्मदहनाचा इशारा मागे घेत असल्याचे पत्र अधिष्ठात्यांना दिले. संस्थेची प्रतिमा कायम राखण्यासाठी व अधिष्ठाता यांच्या आश्वासनाला अनुसरून हा इशारा मागे घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.डॉ. हुमने यांचा प्रभार काढला!डॉ. कल्पना काळे यांनी डॉ. हुमने यांच्यावर आरोप केल्यानंतर अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी त्यांच्याकडून जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाचा प्रभार या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत काढण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. हुमने हे सध्या प्रकृती अस्वास्थामुळे रजेवर आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत या विभागाचा प्रभार अधिष्ठात डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्याकडे राहणार आहे.चौकशी समितीला एका महिन्यात तपास पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे. यानंतर डॉ. कल्पना काळे यांनी आत्मदहनाचा इशारा मागे घेतला आहे. या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी रुग्णालय प्रशासन प्रयत्नरत असून, लवकरच यावर सामोपचाराने तोडगा काढण्यात येईल.- डॉ. राजेश कार्यकर्ते, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय