शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

अकोला ‘जीएमसी-सर्वोपचार’च्या समस्या मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 2:32 PM

अकोला : केवळ जिल्ह्यातीलच नव्हे, तर लगतच्या जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड ठरलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाला लागलेले समस्यांचे ग्रहण काही अंशी सुटण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देऔषधांच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी स्थानिक खरेदीची मर्यादा १ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी बैठक घेतली. अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते पदे रुपांतरीत करण्याबाबतचा प्रस्ताव त्वरीत शासनाकडे सादर करणार आहेत.

अकोला : केवळ जिल्ह्यातीलच नव्हे, तर लगतच्या जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड ठरलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाला लागलेले समस्यांचे ग्रहण काही अंशी सुटण्याची चिन्हे आहेत. औषधांच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी स्थानिक खरेदीची मर्यादा १ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. तर रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची मुंबई येथे भेट घेऊन सर्वोपचार रुग्णालयाच्या समस्या मार्गी लावण्यासंदर्भात चर्चा केली.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे ८ सहयोगी प्राध्यापक व १५ सहाय्यक प्राध्यापकांची अशी एकूण २३ पदांची निर्मिती करणे आवश्यक आहे. या पदांची निर्मिती झाल्यानंतर सध्यस्थितीत चालू असलेल्या १० विषयांतील पदव्यूत्तर अभ्यासक्रमासोबत उर्वरित १० विषयांमध्ये पदव्यूत्तर अभ्यासक्रमाची निर्मिती होणार आहे. यामुळे वैद्यकीय महाविद्यालयात तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होऊन रुग्णसेवांमध्ये आमुलाग्र बदल होणार आहे. यासाठी मुंबईत ७ आॅगस्ट रोजी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी बैठक घेतली. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.प्रस्ताव शासनाकडे पाठविणारपदव्यूत्तर अभ्यासक्रमासाठी प्राध्यापकांची २३ पदे रुपांतरीत करणे गरजेच आहे. अधिष्ठाता डॉ. कार्यकर्ते यांनी हे पटवून दिल्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी वैद्यकीय शिक्षण खात्याचे प्रधान सचिवांसोबत दूरध्वनीवरुन चर्चा करुन त्यांना सदर बाबींबाबत निर्देश दिले. यानूसार अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते पदे रुपांतरीत करण्याबाबतचा प्रस्ताव त्वरीत शासनाकडे सादर करणार आहेत.वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आम्ही वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या समस्या मांडल्या. अत्यंत सकारात्मक झालेल्या या बैठकीत वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी पदे रुपांतरीत करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. औषध खरेदीची मर्यादाही वाढल्याने स्थानिक पातळीवर जास्त प्रमाणातऔषधांची खरेदी करता येणार आहे. त्यामुळे रुग्णांना आवश्यक औषधांचा तुटवडा भासणार नाही.

- डॉ. राजेश कार्यकर्ते, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील