शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

परिचारिकांच्या रिक्त जागांपैकी ३० जागांचा प्रश्न लागणार मार्गी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 14:30 IST

सर्वोपचार रुग्णालयात परिचारिकांची ५४ पदे रिक्त असून, यातील ३० पदे भरण्यास लवकरच मंजुरी मिळणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात परिचारिकांची ५४ पदे रिक्त असून, यातील ३० पदे भरण्यास लवकरच मंजुरी मिळणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे वाढत्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य सेवेवरील ताण काही प्रमाणात कमी होणार असल्याने परिचारिकांना दिलासा मिळणार आहे.सर्वोपचार रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या तुलनेत वैद्यकीय सेवेचा आधार असलेल्या परिचारिकांची संख्या एक तृतीयांशपेक्षाही कमी आहे. येथे मंजूर ३८३ पदांपैकी ३२९ पदे भरण्यात आलेली असून, इतर ५४ पदे रिक्त आहेत. सर्वोपचार रुग्णालयातील रुग्ण संख्या लक्षात घेता प्रत्येक वॉर्डात किमान १५ परिचारिकांची गरज आहे; पण सध्या एका वॉर्डात केवळ पाच परिचारिका रुग्ण सेवा देत आहेत. क्रिटिकल सेंटर, अपघात कक्ष, अतिदक्षता कक्षात मात्र १२ परिचारिका रुग्ण सेवा देत आहेत. त्यामुळे रुग्ण सेवेवर प्रचंड ताण येत आहे. दरम्यान, १९०० परिचारिकांच्या जागा तत्काळ भराव्या, यासाठी सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाकडून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता; मात्र अद्यापही हा प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे. असे असले तरी रिक्त असलेल्या ५४ पदांपैकी ३० पदांना मंजुरी मिळणार असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वरिष्ठ अधिकाºयाने दिली.मंजूर पदे - ३८३भरलेली पदे - ३२९रिक्त पदे - ५४अशी आहे स्थिती

  • सर्वोपचारमधील एकूण खाटा ७१९
  • दररोज ७०० रुग्णांवर वॉर्डात उपचार
  • १५०० पेक्षा जास्त रुग्ण बाह्य रुग्ण विभागात
  • ३० महिलांची होते दररोज प्रसूती
  • ३ रुग्णांमागे हवी एक परिचारिका.

कामाचा ताणआयसीयू, पीबीयूमध्ये एका रुग्णासाठी एक परिचारिका आवश्यक आहे; मात्र येथे २० रुग्णांमागे दोन परिचारिकांना काम करावे लागते. यावरून परिचारिकांवर असलेल्या कामाचा ताण लक्षात येतो.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय