अकोला ‘जीएमसी’ला दोन दिवसात नवे अधिष्ठाता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 14:42 IST2019-09-17T14:40:11+5:302019-09-17T14:42:43+5:30

दोन दिवसात नवे अधिष्ठाता रुजू होणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

Akola 'GMC' to be get new Dean in two days | अकोला ‘जीएमसी’ला दोन दिवसात नवे अधिष्ठाता

अकोला ‘जीएमसी’ला दोन दिवसात नवे अधिष्ठाता

ठळक मुद्दे नवीन अधिष्ठातापदी डॉ. शिवहरी घोरपडे यांच्या नावाची चर्चा. वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रभार डॉ. कुसुमाकर घोरपडे सांभाळत आहेत.


अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आगामी दोन दिवसात नवे अधिष्ठाता रुजू होणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नवीन अधिष्ठाता येणार असल्याची चर्चा सोमवारी जीएमसीत वर्तुळात चर्चेचा विषय होता. नवीन अधिष्ठातापदी डॉ. शिवहरी घोरपडे यांच्या नावाची चर्चा असून, येत्या दोन दिवसात ते अधिष्ठाता पदाची सूत्रे हाती घेणार असल्याची माहिती विश्वसनीय वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला नवे अधिष्ठाता मिळाले असले, तरी ते प्रभारीच असणार आहेत. सध्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रभार डॉ. कुसुमाकर घोरपडे सांभाळत आहेत.

 

Web Title: Akola 'GMC' to be get new Dean in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.