शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

अकोला : लाकडाच्या अवैध वाहतूकप्रकरणी वनविभागाने केला गुन्हा दाखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 19:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपातूर (अकोला):   पातूर -वाशिम रोडवरील घाटाजवळील चिंचखेड फाट्याजवळ सोमवार १८ डिसेंबरच्या सकाळी ९.३0 वाजताच्या सुमारास बाभूळ, निंबाच्या पेर्‍या व जलतनाची विना परवाना वाहतूक करणार्‍या एम.एच. ३0 एबी ११७0  क्रमांकाचा ट्रक अडवून वनविभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी ट्रक जप्त केला. या ट्रकमधील  ८ ते १0 टन वजनाच्या  ६0 हजार रुपये ...

ठळक मुद्देपातूर-वाशिम मार्गावरील चिंचखेड फाट्याजवळील घटना एम.एच. ३0 एबी ११७0 क्रमांकाचा ट्रक जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कपातूर (अकोला):  पातूर-वाशिम रोडवरील घाटाजवळील चिंचखेड फाट्याजवळ सोमवार १८ डिसेंबरच्या सकाळी ९.३0 वाजताच्या सुमारास बाभूळ, निंबाच्या पेर्‍या व जलतनाची विना परवाना वाहतूक करणार्‍या एम.एच. ३0 एबी ११७0  क्रमांकाचा ट्रक अडवून वनविभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी ट्रक जप्त केला. या ट्रकमधील  ८ ते १0 टन वजनाच्या  ६0 हजार रुपये किमतीच्या पेर्‍या व तीन लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण ३ लाख ६0 हजार रुपयांचा माल जप्त करुन वाहन चालकाविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२६ चे कलम ४१ व महाराष्ट्र अधिनियम २0१४ चे कलम ३१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सहायक वनसंरक्षक एन.सी. गोंडाने यांच्या मार्गदर्शनात पातूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी जी.डी. देशमुख, पातूरचे क्षेत्र सहाय्यक एस.यू. वाघ, अविनाश घुगे वनरक्षक यांच्या पथकाने केली. पातूर वनपरिक्षेत्रांतर्गत चोंढी, माळराजूरा, बोडखा व पातूर असे चार राऊंड आहेत व त्या चार राऊंडमध्ये १७ बीट आहेत. या बीटमधून बर्‍याच वेळा विनापरवाना आडजात लाकडाची वाहतूक होत असते. मागील एका महिन्यात अशा चार घटना उघडकीस आल्या असून त्याबाबत गुन्हेसुद्धा दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी एक महिना अगोदर बाभूळगाव रोडवर,  दुसर्‍यांदा ७ डिसेंबर रोजी पातूर-अकोला रोडवरील चिखलगावजवळ कारवाई करून  एम.एच.३0 एल. ५६६ क्रमांकाच्या वाहनामधील  बेहाळा व बाभूळीच्या बारा पेर्‍या व जलतन असा २0 हजार रुपये किंमतीचा ३ टन  माल व   एक ते दीड लाख रुपये किंमतीचे वाहन जप्त करण्यात आले. मालाचा दंड न भरल्यामुळे सदर वाहन सध्या वनविभागात उभे आहे. अवघ्या एका महिन्यात तीन घटना उघडकीस आल्यामुळे आडजात लाकडाची विना परवाना वाहतूक करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

विना परवाना आडजात मालाची वाहतूक केल्याप्रकरणी मोका पंचनामा व गुन्हा दाखल करुन गाडी ताब्यात घेतली आहे. याबाबत संबंधिताकडे कागदपत्राची मागणी केली. मालाची व गाडीची कागदपत्रे मिळाल्यानंतर तो माल कुठला आहे त्यासंबंधी तपास करुन दंड करण्यात येईल.- जी.डी. देशमुख, वनपरिक्षेत्र अधिकारी, पातूर

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणforestजंगलCrimeगुन्हा