शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
2
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
3
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
4
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
5
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
6
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
7
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
8
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
9
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
10
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
11
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
12
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
13
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
14
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
15
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
16
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
17
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?
18
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
19
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
20
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी

प्राणी-पक्ष्यांचे हुबेहूब आवाज काढणारा कलाकार काळाच्या पडद्याआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2019 13:19 IST

ज्यांनी आदिवासी भागातील लोककला ‘कांबडनृत्य’ ‘दिल्ली’पर्यंत नेले, असे प्राणी-पक्षी यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करुन पयर्टकांचे मनोरंजन करणारे सुवर्ण पदकाने सन्मानित, अकोले तालुक्यातील उडदावणे येथील ठाकर समाजातील अवलिया कलाकार ठका कुशाबा गांगड यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धापकाळाने रविवारी (10 फेब्रुवारी) सकाळी 8.30 वाजता निधन झाले.

अकोले: ज्यांनी आदिवासी भागातील लोककला ‘कांबडनृत्य’ ‘दिल्ली’पर्यंत नेले, असे प्राणी-पक्षी यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करुन पयर्टकांचे मनोरंजन करणारे सुवर्ण पदकाने सन्मानित, अकोले तालुक्यातील उडदावणे येथील ठाकर समाजातील अवलिया कलाकार ठका कुशाबा गांगड यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धापकाळाने रविवारी (10 फेब्रुवारी) सकाळी 8.30 वाजता निधन झाले.‘ठकाबाबा’ म्हणून ते तालुक्यात परिचित होते. भंडारदरा धरणाच्या पाणलोटातिल दुर्गम आदिवासी खेड उडदावणे येथे १९३२ मध्ये ठकाबाबाचा जन्म झाला. पशु-पक्ष्यांचे हुबेहूब आवाज आणि अंगी बाणलेल्या विनोदीवृत्तीच्या ‘नानाकळा’ हेच ठकाबाबांचे आयुष्याचे भांडवल होते. अगदी सहजगत्या ते जीभ स्वत:च्या नाकाच्या शेंड्याला टेकवत आणि रामदेवबाबा सारखा पोटाचा गोळा करुन ‘नागफणा’करुन दाखवत.

सह्याद्रीच्या डोंगररांगात धुंवाधार बरसणारा पाऊस,घोगावत वाहणारा बेफान वारा, कड्यावरुन कोसळणाऱ्या धबधब्यांचा धीरगंभीर आवाज,ओढ्यानाल्यांचा खळखळाट, बिबट्याच्या डरकाळ्या, मोरांचा केकारोे, पशुपक्ष्यांचे मंजूळ आवाज असे निसर्ग संगीताचे हुबेहूब आवाज तोंडने काढण्याची कला त्यांना अवगत होती. ही कला आणि पारंपारिक नृत्याच्या जोरावर ठकाबाबांनी दिल्लीपर्यंत धडक मारली.

सन १९६५ च्या प्रजासत्ताकदिनी येथील आदिवासी कलाकारांचे पथक दिल्लीतील राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी झाले. त्यावेळी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने प्रथम क्रमांक मिळविला. तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री तसेच इंदिरा गांधी यांच्या हस्ते पथकाला सुवर्णपदकाने सन्मानीत करण्यात आले, या पथकात ठकाबाबांचा समावेश होता.

हरहुन्नरी ठकाबाबा यांनी आदिवासी भागातील ‘बोहडा’लोककला जोपाण्याचे काम ही केले आहे. एक दिड वर्षांपूर्वी ‘चला हवा येवू द्या’चा कार्यक्रम संगमनेरला झाला त्यावेळीही ठकाबाबा यांचा सन्मान करण्यात अला होता.त्यांच्या निधनाने आदिवासी भागात हळहळ व्यक्त कोत आहे.